भुसावळ- भुसावळातील क्रीडा शिक्षक प्रदीप साखरे यांची भारतीय बाऊल्स स्पोर्ट्स फेडरेशनच्या ऑर्गनायझेशन सचिवपदी निवड करण्यात आली. बाऊल्स स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाची वार्षिक सर्वसाधारण सभा अहमदाबाद येथे नुकतीच झाली. यात खेळाच्या प्रचार व प्रसारासाठी प्रयत्न करून आंतरराष्ट्रीय पातळीवरून प्रशिक्षक मागवून प्रतेक राज्यातून दोन महिला व दोन पुरूष प्रशिक्षक बोलावून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
चायना येथे होणार्या वर्ल्ड चॅम्पीयनशीप ऑक्टोंबर महिन्यात होत असून त्यात भारतीय संघ सहभागी होणार असून त्यासाठी निवड चाचणी घेण्याचे ठरले. 2018-19 या वर्षासाठी स्पर्धेचे नियोजन निश्चित करण्यात आले. यात सिनिअर (खुला) गट – मध्यप्रदेश, ज्युनियर (19 वर्षाआतील) गुजरात व सबज्युनिअर (15 वर्षाआतील) महाराष्ट्रात स्पर्धा घेण्याचे निश्चित झाले. प्रसंगी बाऊल्स स्पोर्टस् फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकारिणीत फेडरेशनचे अध्यक्ष तथा मंत्री गिरीशचंद्र परमार यांनी ऑर्गनाईझ सचिवपदी महाराष्ट्राचे सचिव प्रदीप साखरे यांची तर उपाध्यक्षपदी प्रमोद ठाकुर (छत्तीसगड) तर सहसचिवपदी डी.दत्तात्रय (तामिळनाडू) यांची तर नॉर्थझोन प्रमुखपदी जितेंद्र शर्मा (हरीयाणा) व वेस्ट झोन प्रमुखपदी पंकज जैन (मध्यप्रदेश) यांची निवड करण्यात आल्याचे घोषीत करण्यात आले. प्रसंगी फेडरेशनचे सचिव एम.पी.दुलेरा, कोषाध्यक्ष भरत चव्हाण व इतर राज्य सचिव उपस्थित होते.