प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती मिळावी

0

देहूरोड । केंद्रशासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) मध्ये सन 2022 पर्यंत सर्वांसाठी पक्केघर ही योजना देहूरोड कॅन्टोन्मेंटमध्ये राबविण्यासाठी देहूरोड कॅन्टोन्मेंट परिसरातील बेघर नागरिकांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यकारी अधिकार्‍यांनी काय उपाय योजना केली आहे. याची माहिती मिळण्याबाबत देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष दीपक चौगुले यांनी मा. मुख्य अधिशासी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

नागरिक संभ्रमात
दीपक चौगुले यांनी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केंद्रशासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) मध्ये सन 2022 पर्यंत सर्वांसाठी पक्केघर ह्या योजनेअंतर्गत देहूरोड कॅन्टोन्मेंट मंडळातील जवळजवळ 3 ते 3.5 हजार बेघर नागरिकांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. त्यांना या योजनेच्या कार्यवाही बाबत पुढील मार्गदर्शन न मिळाल्याने नागरिक संभ्रमात आहेत. तेव्हा योजनेच्या अंमलबजावणी बाबत छावणी मंडळाने काय कार्यवाही केली त्याबाबत मार्गदर्शन करावे असे म्हटले आहे.