भुसावळ। शहरातील प्रभाग क्रमांक 24 मध्ये 45 लाख रुपये निधीतून डांबरीकरण झालेल्या रस्त्याचे लोकार्पण व उद्घाटन आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. शिरपूर-कन्हाळा रस्त्यावरील आरएमएस कॉलनी, अमरनाथ नगर, साईदत्त नगर, पंढरीनाथ नगर, प्रेरणा नगर, स्वामी समर्थ कॉलनी या भागात डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.
उद्घाटनास यांची होती उपस्थिती
याप्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, भाजपा शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, गटनेते मुन्ना तेली, नगरसेवक किरण कोलते, वसंत पाटील, प्रा. सुनिल नेवे, राजेंद्र आवटे, बोधराज चौधरी, किशोर पाटील, गिरीश महाजन, अमोल इंगळे, पिंटू ठाकुर, प्रा. दिनेश राठी, देवा वाणी, सतिश सपकाळे, बापू महाजन, नगरसेविका सोनल महाजन यांची उपस्थिती होती.