चाकण : येथील युवा कार्यकर्ते अभिमन्यू शेलार यांची शेतकरी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र शेतकरी युवा आघाडी विभाग प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. संघटनेच्या नुकत्याच चाकण येथे झालेल्या बैठकीत शेतकर्यांना 100% कर्जमाफी मिळावी यासाठी येत्या 1 ऑगस्टला मोर्चाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शेतकर्यांच्या कर्ज वसुलीस दहा वर्षे स्थगिती द्यावी, जमीन सिलिंग कायदा रद्द करावा, असे मुद्दे प्रस्तावात मांडले. तसेच शेतकर्यांना पुन्हा कर्जमाफी देण्याची वेळ येऊ नये, यासाठी शेतकर्यांना बाजारपेठेचे स्वातंत्र्य द्यावे, तंत्रज्ञान प्रक्रिया उद्योग यांची माहिती द्यावी हेही मुद्दे नमूद करण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद गद्रे, अनिल चव्हाण, सीमा नरोडे, श्याम पवार, तालुका अध्यक्ष बाळासाहेब दौंडकर, लक्ष्मण रांजणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. शरद गद्रे यांनी सूत्रसंचालन केले.