प्रलंबित प्रकरणांचा त्वरीत निपटारा करा

0

जळगाव । जळगाव जिल्हा वकिल संघातर्फे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश सविता टी.बारणे यांचा 31 रोजी सत्कार आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी न्या.बारणे यांनी प्रलंबित प्रकरणांचा लवकर निपटारा करण्याचे तसेच 9 सप्टेंबर रोजीच्या लोक अदालतील जास्तीजास्त प्रकरणांचा समावेश करून ते प्रकरण तडजोड करण्याचे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष ऍड.आर.आर.महाजन यांच्याहस्ते न्या.बारणे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. आर.आर.महाजन यांनी भाषणात सर्व न्यायाधिश व वकिल मंडळींनी सामंज्यसाने काम करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. याप्रसंगी जळगाव जिल्हा वकिल संघाचे सचिव अ‍ॅड. अनिल पाटील, उपाध्यक्ष अ‍ॅड. मिलींद बडगुजर, अ‍ॅड.महेश ढाके, सहसचिव अ‍ॅड.रत्नाबाई चौधरी व कार्यकारी सदस्य अ‍ॅड.श्रीमकृष्ण निकम, अ‍ॅड.रजनीश राणे, अ‍ॅड.मंगेश सरोदे, अ‍ॅड.शरिफ शेख, अ‍ॅड.प्रविण शिंदे, अ‍ॅड.राहुल अकुलकर, अ‍ॅड.योगेश पाटील, अ‍ॅड.अर्चना भदादे व अ‍ॅड.मंजुळा मुंदडा उपस्थित होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड. मिलींद बडगुजर, सुत्रसंचालन अ‍ॅड.अनिल पाटील तर आभार महेश ढाके यांनी व्यक्त केले.