राज्यातील नगरपरिषद, पंचायातीमधील कर्मचारी, सफाई कामगार, रोजंदारी कर्मचारी, अनुकंपा धारकांनी पुकारला संप
मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी वैभव आवारे यांना सादर
तळेगाव दाभाडे : महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदा तसेच पंचायात समितीमधील कर्मचारी, सफाई कामगार, रोजंदारी कर्मचारी, अनुकंपा धारक यांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता होत नसल्याने 1 जानेवारी पासून बेमुदत कामबंद आंदोलन तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या कर्माचार्यांनी पुकारले आहे. आपल्या मागण्यांचे निवेदन कर्मचार्यांनी मुख्याधिकारी वैभव आवारे यांना दिले आहे. यामध्ये संघटनेमार्फत बरीच आंदोलने झाली आहेत. सर्व कर्मचार्यांना सातवा वेतन लागू करणे गरजेचे आहे. हे सर्व राज्य शासनाचे कर्मचारी आहेत मग त्यांना वेतन आयोग लागू न करणे हे चुक आहे. त्यासाठी वेतन आयोग लागू करावा, ही त्यांची प्रमुख मागणी आहे.
हे देखील वाचा
मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष
शासनाकडे वेळोवेळी मागण्यांचा पाठपुरावा केला जात आहे. परंतु या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत आहे. या कारणास्तव राज्यातील सर्व संघटनाच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य नगरपालिका, नगर पंचायत कर्मचारी व सवंर्ग कर्मचारी कामगार संघटना संघर्ष समितीने निर्णय घेतला आहे. त्यानुसार न्याय मागण्या मान्य करण्या करिता नगर पालिकेमध्ये सर्व कर्मचारी 1 जानेवारी पासून बेमुदत काम बंद आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाची नोटीस मुख्याधिकारी तळेगाव दाभाडे नगर परिषद, नगर सचिव मंत्रालय, नगर पालिका प्रशासन संचालनालय, तळेगाव दाभाडे नगर परिषद नगराध्यक्षा, जिल्हाधिकारी पुणे, पोलीस अधीक्षक पुणे, उपविभागीय अधिकारी पुणे, तहसीलदार मावळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक तळेगाव दाभाडे यांना देण्यात आल्या आहेत.या आंदोलनात सर्व नगर परिषद कर्माचार्यांनी सहभाग घेतला आहे.
कर्मचार्यांच्या केलेल्या मागण्या
या निवेदनातील प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत. सर्व शासकीय कर्माचार्यांप्रमाणे नगर पालिका कर्माचार्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, पाच दिवसांचा आठवडा करावा, रोजंदारी वरील कर्मचारी कायम करावे. सफाई कामगारांचे प्रश्न त्वरित निकाली काढावेत, स्वच्छता निरीक्षकाचा सवंर्ग करण्यात यावा, सवंर्ग कर्माचार्यांचे प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्यात यावे, आदि मागण्या करण्यात आल्या आहे.