प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा

0

नंदुरबार। आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी नंदुरबार व तळोदा येथील नगर परिषद कर्मचार्‍यांनी काल बुधवारी सामूहिक रजा टाकून कामबंद आंदोलन केले. राज्यातील नगर परिषद व नगर पंचायत कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी राज्य नगर परिषद कर्मचारी सघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी संपात सहभागी होण्याचा निर्णय नगर पालीका कर्मचारी संघटनेने घेतला आहे. 9ऑगस्ट रोजी पालीकेतील सर्व कर्मचार्‍यांनी सामुहीक रजा घेवून नगर परिषद काम बंद पाडले.

15 ऑगस्टपासून बेमुदत संपाचा इशारा
महाराष्ट्र राज्य नगर पालिका व नवनिर्मीत नगरपंचायतमधील कार्यरत सर्व मुख्याधिकारी, कर्मचारी,अधिकारी ,संवर्ग कर्मचारी, रोजंदारी कंत्राटी कर्मचारी अनुकंपाधारक कर्मचारी यांच्या प्रलबित मागण्या संदर्भात संघटनेमार्फत पाठपुरवा करूनही शासन दुर्लक्ष करीत आहे. म्हणून आंदोलन करण्यात येत आहे. नंदुरबार पालिकेसमोर बसून कर्मचार्‍यांनी ठिय्या आंदोलन केले. तसेच 10 ते 14 ऑगस्टपर्यंत काळ्या फिती लावून काम करणार आहेत. 15 ऑगस्ट रोजी जिल्हयातील खासदार ,आमदार, नगराध्यक्ष, यांना निवेदन देणार आहेत. शासनाने याची दखल घेतली नाही तर 15 ऑगस्ट पासून नगर पालीकेतील सर्व अधिकारी कर्मचारी अत्यावशक सेवेसह बेमुदत संपावर जातील असा इशारा दिला आहे.