प्रवाशांना मोठा दिलासा : भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस पुन्हा प्रवाशांच्या सेवेत

भुसावळ : भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस रविवारी पुन्हा प्रवाशांच्या सेवेत कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीनंतर गाडी सुरू झाली आहे. यामुळे नाशिक, कल्याण, पनवेल, लोणावणा येथे जाणार्‍या प्रवाशांना ही गाडी आता सोयीची झाली आहे. हुतात्मा गाडीची गेल्या वर्षभरापासून मागणी होत होती. रेल्वे प्रवाशांनी या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडे वारंवार मागणी केली होती.

कमी भाड्यात पुणे जाण्याची सोय
रविवारी रात्री 12.30 पासून ही गाडी सुरू करण्यात आली आहे. यामुळे आता पुणे येथे जाण्यासाठी प्रवाशांना हुतात्मा एक्स्प्रेस ही गाडी फायदेशीर राहणार आहे.