प्रवीण निकम याला मिळणारा प्राईड पुरस्कार

0

विवारी होणार पुरस्कार वितरण

चिंचवड : चिंचवड सिटीजन फोरम (पीसीसीएफ) च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त या वर्षीपासून प्रथमच ‘प्राईड ऑफ पिंपरी-चिंचवड हा पुरस्कार’ देण्यात येणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून पिंपरी-चिंचवड शहराच्या नावलौकिकात भर घालणार्‍या एक नागरिकाला हा पुरस्कार दिला जाणार आहे. तर, सामाजिक कार्यात अग्रेसर एक सामाजिक संस्था आणि एक गृहनिर्माण सोसायटीला सामाजिक कार्यगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

सायन्स पार्क येथील सभागृहात रविवारी (दि.13) सायंकाळी हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. प्राईड ऑफ पिंपरी-चिंचवड हा पहिला पुरस्कार महिलांच्या मासिक पाळीबाबत जनजागृतीचे काम करणार्‍या प्रवीण निकम या तरुणाला दिला जाणार आहे. निकम यांनी मासिक पाळीबाबत समाजाच्या सर्व स्तरात जागृतीचे महत्त्वाचे काम केले आहे. त्यांच्या या कामाची दखल राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. सन 2016 मध्ये त्यांना राष्ट्रीय युवा सन्मान, तसेच युनायटेड नेशन्सचे जागतिक युवा अँबेसिडर म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.

त्याबरोबर शहराच्या दृष्टीने उल्लेखनीय सामाजिक कामगिरी करणार्‍या दोन संस्थांना सामाजिक कार्यगौरव पुरस्कार देऊन देऊन गौरविले जाणार आहे. सामाजिक संस्थांमधून हा पुरस्कार जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम हे अभियान राबविणार्‍या रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी या संस्थेला दिला जाणार आहे. तर, गृह निर्माण सोसायट्यांमधून हा पुरस्कार पाणी बचतीसाठी पुढाकार घेणार्‍या रावेतमधील सेलेस्टीयल सोसायटीला दिला जाणार आहे.