प्रवीण परदेशी यांनी घेतला मुंबई महापालिका आयुक्तपदाचा पदभार

0

मुंबई: मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परदेशी यांनी आज १३ रोजी महापालिकेचा पदभार स्वीकारला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.