जैताणे (रविंद्र जाधव) । राज्यात वाचन चळवळ राबविणारे कोठली ता.शहादा येथील रहिवासी व सध्या पुणे येथे असलेले प्रवीण सुरेश महाजन यांना लातूर येथे झालेल्या कार्यक्रमात ’महात्मा फुले समाजरत्न पुरस्काराने ’गौरविण्यात आले. त्याचबरोबर 28 नोव्हेंबर रोजी ’महात्मा फुले स्मृतिदिनानैमित्त’ माळी समाज सेवा समिती नाशिक यांच्यातर्फ ’समाजभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
एकाच वेळी दोन पुरस्कार मिळल्याबद्दल महाजन यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. मूळचे नंदुरबार जिल्ह्यातील रहिवाशी असलेले महाजन हे विनाअनुदाणीत माध्यमिक शाळा,आश्रमशाळामध्ये मोफत ग्रंथालये व संगणक कक्ष स्थापन करतात. त्याचंबरोबर शैक्षणिक विकासासाठी दरवर्षी विविध स्पर्धाचे आयोजन करतात. रोजगार मार्गदर्शनासह विविध विषयांवर लिखाण करणारे प्रवीण महाजन हे साहित्यिक असून युवा वर्गासाठी ते मार्गदर्शक म्हणून कार्य करीत असतात.पुणे येथील विविध सेवाभावी संस्था,आयटी क्षेत्रातील कंपन्याचं सहकार्य मिळवून शैक्षणिक विकासाठी झटणारे ते सामाजिक कार्यकर्त आहेत. महाजन यांना यापूर्वी विविध पुरस्कारानीं गौरवले असून त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.