यावल- तालुक्यातील चुंचाळे येथे सुनील नेवे एकता फाऊंडेशन यांच्या वतीने सुनील नेवे एकता फाऊंडेशन फलक अनावरण निमित्ताने हास्य कलाकार प्रवीण शांताराम माळी यांचा ‘आयंत पोयंत सख्यानं’ या धमाल विनोदी एकपात्री नाटीकेचे आयोजन श्री सुकनाथ बाबांच्या मंदिर परीसरात करण्यात आले. या विनोदी नाटकात लगीन घरची धावपळ कशी असते या विषयावर नाटय प्रयोग करुन माळी यांनी चुंचाळेकर ग्रामंस्थाना पोट धरून हसायला भाग पाडले.
अहिराणी भाषेचाही अभिमान -प्रवीण माळी
विनोदी एकपात्री अभिनय सुरू करण्याअगोदर प्रवीण माळी म्हणाले की, मराठी सोबत मला अहिराणी भाषेचा अभिमान आहे. या भाषेने मला ज्ञान व संस्कृती दिली. खान्देशची माऊली बहिणाबाई यांनी काव्य करून अहिराणी भाषा समृद्ध केली. म्हणून मला त्या वंदनीय आहे. त्याचप्रमाणे चुंचाळे ही भूमी संत सुकनाथबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली असून या पावन भूमीत मला सामाजिक कार्यकर्ते सुनील नेवे यांच्यामुळे कार्यक्रम घेण्याचे भाग्य लाभत आहे. नेवे यांचे सामाजिक कार्य मला प्रेरणा देणारे असून ते ‘परीसा’प्रमाणे आहे. त्यांच्या स्पर्शाने माझ्या जीवनाचे सुध्दा सोने बनले आहे, अशी भावविक साद माळी यांनी घातली. या कार्यक्रमास साकळी, धानोरा परिसरातील पत्रकार मंडळी तसेच गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
यांनी घेतले परीश्रम
यशस्वीतेसाठी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विठ्ठल राजपूत, जि.प.शाळा समिती अध्यक्ष गोकुळ कोळी, तंटामुक्ती अध्यक्ष धनसिंग राजपूत, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्रकाश चौधरी, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य जुम्मा तडवी, सामाजिक कार्यकर्ते हेमंत सावकारे, सुधीर चौधरी यांच्यासह सुनील नेवे, एकता फाऊंडेशच्या सदस्यांनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन वाय.वाय.पाटील यांनी तर आभार प्रशांत सोनवणे यांनी मानले.
यांची होती उपस्थिती
या नाटीकेच्या अगोदर कार्यक्रमाचे विकासोचे माजी चेअरमन सुनील नेवे तसेच मान्यवरांच्या हस्ते श्री वासुदेव बाबाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावल पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी.के.परदेशी यांच्या हस्ते सुनील नेवे एकता फाऊंडेशनच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. प्रसंगी माजी चेअरमन सुनील नेवे, अखिल भारतीय ग्रामी पत्रकार संघाचे चोपडा शहरध्यक्ष सागर तायडे ,चुंचाळे ग्रामपंचायत सदस्य दगडू तडवी, अनिल कोळी, सुकलाल पाटील, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विठ्ठल राजपूत यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.