प्रवेशासाठी शिक्षकांची भटकंती

0

लोणखेडा। दि. 15 ला शाळा प्रवेशाचा पहिला दिवस साजरा करण्यात आला,विद्यार्थांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत झाले परंतु इ.5 वी चा प्रवेशवर्ग सुरु राहावा व आपल्या वरील अतिरिक्त शिक्षक होण्याची पाळी येऊ नये म्हणून शिक्षकांची शहरात भटकंती सुरु आहे. शहरात शेठ व्ही.के. शहा विद्यामंदिर, वसंतराव नाईक माध्य., शारदा कन्या विद्यालय,म्युन्सिपल हायस्कूल, लाड़कोरबाई, लाभोदय, व्हॉलंटरी, बी.एस.भामरे विद्या,सातपुडा विद्या, वाल्मीकि विद्यालय अश्या विविध मराठी माध्यमांच्या शाळा आहेत. दरवर्षी इ.5 वी च्या वर्गाची वर्गसंख्या टिकविण्यासाठी शिक्षकांना शर्तीचे प्रयत्न करावे लागतात.

शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान
एकीकडे शासनाचा हा घेतलेला निर्णय योग्य आहे कारण लहान-लहान मूल खेड्या-पाडयातुन शहरात शिक्षणासाठी येतात.त्यांना होणारा प्रवासाचा त्रास व वेळेचा अपव्यय टाळणे हे धोरण जरी चांगले असले. परंतु त्यांना शिकविणारे शिक्षक कुठल्याही भागातील शिक्षण पूर्ण केलेले पाहिजेत नाहीतर अतिरिक्त झालेले शिक्षक तेथे सामावले गेले पाहिजेत.परंतु हे करत असतांना शासनाने दुसर्‍या बाजूला शहरातील मान्य असलेल्या तुकड्या तेथील विद्यार्थी संख्या याच्यावर परिणाम होणार नाही याची देखील काळजी घेतली पाहिजे. याकरीता गावोगावी जावून शिक्षक विद्यार्थ्यांच्या पालकांचे समुपदेशन करून आपल्या पाल्यांना शाळेत प्रवेशासाठी प्रयत्न करत आहेत.

शाळेत प्रवेश घ्यावा यासाठी वेगवेगळी प्रलोभने
विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत प्रवेश घ्यावा यासाठी वेगवेगळी प्रलोभने द्यावी लागतात यामागील कारण शोधले असता या गोष्टीसाठी शासनाचे काही धोरण देखील कारणीभूत आहेत. शासनाने जिथे प्राथमिक मराठी शाळा आहेत .तेथेच इ.5 वी चे वर्ग सुरु केल्याने विद्यार्थी संख्येवर परिणाम झाला आहे.परिणामी शिक्षक अतिरिक्त होऊ लागली आहेत.एकीकडे शिक्षक अतिरिक्त होतो तर जि.प.प्राथमिक शाळेत बर्‍याच ठिकाणी इ.5 वी चा वर्गाला शिकविणारे शिक्षक नाहीत.तरीही शासनाने सक्तीचे आदेश दिल्याने इ.5 वी चा वर्ग त्यांना नाईलाजाने चालवावा लागतो अशी प्रतिक्रिया काही शिक्षकांनी बोलून दाखवली.

इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे वाढते प्रस्थ
माध्यमिक शाळा संकटात सापडणार नाही याची दखल शासन स्तरावर घेणे गरजेचे आहे.केवळ एवढाच एक मराठी शाळेचा वर्गांचा त्रास नाही तर शहरात वेगवेगळ्या संस्थाचालकांनी मोठ्या प्रमाणात इंग्रजी माध्यमांचे प्रस्थ वाढवुन ठेवले आहेत व् पालकांचा ओढ़ा मोठ्या प्रमाणात इंग्रजी शाळेकडेच वळताना दिसतो. म्हणून शासनस्तरावर इंग्रजी माध्यम मराठी माध्यमांच्या एकूण किती शाळा व् वर्ग सुरु असू शकतात यावरच शाळांना मंजूरी देणे गरजेचे आहे.त्यामुळे शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची टांगती तलवार राहणार नाही याला कुठेतरी खिळ बसली पाहिजे अशी शिक्षकांमध्ये चर्चा होतांना दिसून येते.