प्रशांत भूषण यांची याचिका फेटाळली; शिक्षेवर सुप्रीम कोर्ट ठाम

0

नवी दिल्ली: ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी वादग्रस्त ट्वीट करून सर्वोच्च न्यायालयाचे अवमान केले होते. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आहे. त्यांच्या शिक्षेवर आज २० ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. प्रशांत भूषण यांनी शिक्षेला स्थगित मिळावी यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळली असून शिक्षा होईलच असे आदेश दिले. प्रशांत भूषण यांना हा मोठा धक्का आहे. ‘एका व्यक्तीबद्दलचे माझे ते मत होते, न्यायव्यवस्थेवर टीका केलेली नाही’ असे स्पष्टीकरण प्रशांत भूषण यांनी दिले. आता त्यांना काय शिक्षा होते? याकडे लक्ष लागले आहे.

सरन्यायाधीश शरद बोबडे हे नागपूरमधील राजभवनात मोटारसायकलवर स्वार झाल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. त्यावर प्रशांत भूषण यांनी ट्वीटरवर टिप्पणी केली होती. प्रशांत भूषण यांच्या ट्विटची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस बजावली होती.

प्रशांत भूषण यांनी सहा वर्षांतील सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करणारेही ट्विट केले होते. हा न्यायालयाचा अवमान असून भूषण यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी वकील महेश महेश्वरी यांनी केली होती. २२ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली होती.