प्रसिध्दीसाठी तथ्यहीन आरोप करणे हा दमानियांचा उद्योग

0

जळगाव । सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरोधात माजीमंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या कार्यकर्त्यांनी अबु्र नुकसानीचा दावा दाखल केला आहे. दरम्यान सुनावणीस त्या सातत्याने अनुपस्थित राहत असल्याने त्यांच्या विरोधात अटक वारंट जारी केला आहे. कोणतेही ठोस पुरावे नसून त्यांनी केलेले आरोप हे तथ्यहीन आहे. केवळ प्रसारमाध्यमाद्वारे प्रसिध्दी मिळविण्यासाठी कोणावरही खोटे ओराप करणे हा त्यांचा उद्योग असल्याचे आरोप माजीमंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी केले आहे. त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी अनोपचारिक रित्या संवाद साधतांना ते बोलत होते.

पळ काढू नका तुमच्याकडे जर आरोपाची पुरावे असतील तर ते न्यायालयात सादर करा, पुरावे असतील तर ते न्यायालयासमोर मांडून सत्य जनतेसमोर येऊ द्या, न्यायालयाच्या धाकाने पळ का काढता आहात असा सवालही त्यांनी यावेळी दमानिया यांना केला. माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर जावयाची लिमोझीन कार, भोसरी भूखंड प्रकरण, अपसंपदा गोळा करणे, दाऊद यांच्या पत्नीशी संवाद, कार्यकर्त्याचे लाच प्रकरण आदी विषयांवर आरोप केले होते. दमानिया यांनी केलेले सर्व आरोप तथ्यहीन असल्याने खडसे यांची बदनामी करण्याच्या हेतून कृत्य केल्याने त्यांच्या विरोधात भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी रावेर न्यायालयात बदनामीचा फौजदारी खटला दाखल केला होता. दोनवेळा समन्स बजावणी करूनही अंजली दमानिया सतत 7 ते 8 सुनावणीसाठी गैरहजर राहिल्याने न्यायालयाने अटक वॉरंटचे बजावले होते.

चौकशी अहवाल निल
दाऊदच्या पत्नीशी संवाद साधल्याचे कथित आरोप दमानिया यांनी केले. एटीएसद्वारे, केंद्राच्या एजन्सीद्वारे चौकशी करण्यात आली. त्यात काहीही निष्पन्न झाले नाही, जावाईने लग्नाच्या आधीच वाहन घेतले होते त्यामुळे त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही हे देखील निष्पन्न झाले. कोणत्याही प्रकारची अपसंपदा मी जमविलेली नसून संपत्तीचे विवरण निवडणूकीच्या वेळी प्रतिज्ञापत्रात दिले आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी झोटींग समितीने केला असून त्याच्या अहवालही निल आले आहे. त्यामुळे दमानिया यांचे आरोप बेछूट व बिनबुडाचे होते हे निष्पन्न झाल्याचे आमदार खडसे यांनी सांगितले.