प्रस्थानासाठी अलंकापुरी वारकर्‍यांनी फुलली

0

प्रशासन स्वागतासाठी सज्ज

आळंदीः माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी शुक्रवारी 6 रोजी येथून प्रस्थान होत आहे. यानिमित्त येथे आलेल्या भा विकांचे सोयी सुविधांसाठी नगरपरिषदेने तयारी केली असून भाविकांचे स्वागतास आळंदी प्रशासन सज्ज झाल्याचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले. प्रस्थान सोहळ्यास भाविकांसाठी नगरपरिषदेला जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे तयारी केली आहे. कामांची नियोजन पूर्व बैठकांमध्ये वाटप झालेल्या कामाप्रमाणे नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपाध्यक्ष सागर भोसले, यात्रा समिती सभापती पारुबाई तापकीर, खेडचे प्रांत आयुष प्रसाद यांचे सूचनाप्रमाणे तयारी केली झाल्याचे मुख्याधिकारी भूमकर यांनी सांगितले. शहराती 24 तास पाणी पुरवठा विभाग पंपिग सुरु ठेवत सुरळीत पाणी पुरवठा होणार याची दक्षता घेत आहे. यासाठी विविध विभागांमध्ये देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापा लिकेकडे मागणी करण्यात आली आहे. यासाठी कें द्रामधील मशिनरी, मोटार्स इत्यादी सुस्थितीत ठेवण्यात येत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे सहकार्य घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस कर्मचारी, अधिकारी यांच्या नियुक्ती पथकात करण्यात आली आहे. या पथकाचे माध्यमातून शहरातील अतिक्रमणे हटविण्यात येत आहेत. आळंदीत दिवाबत्तीसाठी फ्लडदिवे बसविण्यात आले आहे. वीज पुरवठा खंडित न झाल्यास पाणी आ णि दिवाबत्ती सेवा प्रभावी देण्यात येणार आहे. यातून भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतांना येत आहे. 200 ठिकाणी फ्लडलाईट विद्युत व्यवस्था देण्यात आली आहे. नगरपरिषद कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष कार्यरत राहील. यात व्यवस्थापन कक्षात सर्व खात्यातील कर्मचारी संपर्क यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सी.सी.टी.व्ही ची आषाढी यात्रेवर प्रस्थान काळात सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. शहरात सी.सी.टी.व्ही ची आषाढी यात्रेवर नजर राहील. पोलीस, आळंदी नगरपरिषद कार्यालयातून यात्रा व गर्दीवर नियंत्रण ठेवता येणार असल्याचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले.

नगरपरिषदेने पोलीस यंत्रणेस पब्लिक अ‍ॅडरेस सिस्टिम उपलब्ध करून दिली आहे. यासह वॉकी-टा ॅकी शहरात कार्यरत राहील. यामुळे संपर्क साधण्यास सोयीचे रहाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुचना व बेपत्ता, हरविलेल्या व्यवक्तींचा शोध घेण्यास उपयुक्त होणार आहे. दुरध्वनीसह नगरपरिषदेने खरेदी के लेल्या 20 वॉकी टॉकी कार्यरत ठेवण्यात आल्या आहेत. भाविक भक्तांना सेवा सुविधा देण्यास प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. स्वच्छता कायम राहण्यासाठी नगरपरिषदेने उपाय योजनाकेली आहे. यासाठी 24 तास शहरात कामगार काम करण्यासाठी नियुक्ती दिली आहे. स्वच्छता आणि सफाई आणि क चरा वाहतूक विल्हेवाटीची काम ठेकेदार तसेच नगरपरिषदेचे कामगार कंपहात आहेत. गटारे स्वच्छ करण्यात आली आहेत. कचरा-कुंड्या भरून वाहणार नाहीत याची दक्षता घेऊन काम करण्यात येणार आहे.नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी यांचे कडून नियोजनाची आळंदीत पाहणी पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक, उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे, प्रांत आयुष प्रसाद आदींनी यात्रेचे नियोजन मार्गदर्शक सूचना प्रमाणे क रण्यात आले आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांनी आळंदी मंदिरासह आळंदीत पाहणी केली. माउली मं दिरात व्यवस्थापक माउली वीर यांचे हस्ते जिल्हाधिक ारी नवल किशोर राम, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांचा सत्कार करण्यात आला. आळंदीत लाखो भाविक प्रस्थानसाठी येत असल्याने आरोग्य, स्वच्छता, सुरक्षितता यास नियोजनात प्राधान्य दिल्याचे मुख्याधिकारी भूमकर यांनी सांगितले.

तयारी अंतिम टप्प्यात
आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्‍वस्त अभय टिळक, पालखी सोहळा मालक बाळासाहेब पवार आरफळक र, पालखी सोहळा प्रमुख व विश्‍वस्त विकास ढगे पाटील, विश्‍वस्त अजित कुलकर्णी, योगेश देसाई, नरेंद्र वैद्य, लक्ष्मीकांत देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली श्रींचे पालखी सोहळ्याची तयारी माउली मंदिरात क रण्यात आली आहे. सोहळ्यात परंपरेचे पालन करीत प्रस्थान होणार आहे. यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे व्यवस्थापक माउली वीर यांनी सांगितले. श्रींच्या पालखी सोहळ्यास शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास मुख्य सोहळा सुरू होणार असल्याची माहिती व्यवस्थापक माउली वीर यांनी दिली. तत्पूर्वी सोहळ्याच्या दिवशी पहाटे चार वाजता घंटानाद, क ाकडा आरती, पवमान अभिषेक, पंचामृत पूजा व दुधारती होईल. त्यानंतर पहाटे पाच ते सकाळी नऊ या दरम्यान भाविकांच्या महापूजा आणि श्रीचे समाधी दर्शन होईल. पुढे दुपारी बारा वाजे पर्यंत श्रीचे समाधी दर्शनास गाभारा भाविकांसाठी खुला राहील. दरम्यान सकाळी नऊ ते अकरा यावेळात विना मंडपात कीर्तन सेवा होईल. दुपारी बारा ते साडेबारा या वेळात श्रीचा गाभारा स्वच्छता, श्रीचे समाधीस जलाभिषेक, महानैवेध्ये होणार आहे. त्यानंतर दुपारी दोन पर्यंत पुन्हा भाविकांना श्रीचे समाधी दर्शन घेता येईल. श्रीचे वैभवी प्रस्थान सोहळ्यासाठी 47 दिड्याना मंदिरात प्रवेशण्यास अडीचच्या सुमारास सुरुवात होईल. दरम्यान यावेळी श्रीनां वैभवी पोशाख करण्यास गाभार्‍यात सुरुवात होणार असल्याचे वीर यांनी सां गितले.

पालखी सोहळ्यास प्रारंभ
चारच्या सुमारास श्रीचे वैभवी पालखी सोहळ्याचे मुख्य सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. यात श्री गुरु हैबतरावबाबा यांचे तर्फे आरती, त्यानंतर संस्थान तर्फे श्रीची आरती होईल. मुख्य मानकरी यांना नारळ प्रसाद वाटप, दरम्यान विणामंडपातील पालखीत चल पादुकांची विधिवत प्राणप्रतिष्ठापना होईल. त्यानंतर आळंदी देवस्थानतर्फे मानकर्‍यांना पागोटी वाटप परंपरेने होईल. यानंतर श्रीगुरु हैबतरावबाबा यांचे तर्फे दिंडी प्रमुख, प्रतिष्ठित, मानकरी यांना नारळ प्रसाद वाटप होईल. त्यानंतर संस्थानतर्फे श्रीचे गाभार्‍यात नारळ प्रसाद वाटप झाल्यानंतर श्रीचे पालखीतून विना मंडपातून हरिनाम गजरात मंदिर प्रदक्षिणा, ग्राम प्रदक्षिणा आणि पहिला मुक्काम आळंदीत समाज आरतीने होईल. श्रीचे नवीन दर्शन बारी सभागृहातील जुन्या गांधी वाड्याचे जागेत भा विकांना दर्शन आणि रात्रीचा जागर होईल. सोहळ्यातील तयारीची पाहणी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली असल्याचे त्यांनी सांगितले. भाविकांना सेवा सुविधा, सुलभ दर्शन, भाविकांची सुर क्षितता यास महत्त्व देत कामकाज करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. नियोजनात पालखी सोहळ्यातील मानकरी, सेवक, दिंडी प्रमुख, ग्रामस्थ, पोलीस, महसूल, नगरपरिषद प्रशासन तसेच शासक ीय खात्यातील अधिकारी यांनी केलेल्या सूचनांप्रमाणे मंदिरात व्यवस्था करण्यात आली असल्याचे व्यवस्थापक वीर यांनी सांगितले. दरम्यान श्रींचे पालखी रथाचे सर्जा राजा या बैलजोडीची पुणे पशुवैद्यकीय अधिकारी यांचे पथकाने तपासणी केली असल्याची माहिती बैलसेवेचे मानकरी सचिन घुंडरे यांनी दिली.