प्रस्थान सोहळ्यासाठी देहू सजली; आज देहुत तुकोबांचे प्रस्थान

0

सर्व पातळीवर तयार पूर्ण झाल्याचा प्रशासनाचा दावा

देहूरोडः आषाढीवारीसाठी संत तुकाराम महाराजांचा 333 वा पालखी सोहळा आज दुपारी देहुतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असल्याचे दावे केले जात आहेत. ग्रामपंचायत, जिल्हा महसूल विभाग, पोलीस प्रशासन अशा विविध यंत्रणा सजज झाल्या आहेत.

‘संपत्ती सोहळा नावडे मनाला । लागला टकळा पंढरीचा ॥’ या भक्तीभावाने आषाढीवारीसाठी संतजन व्याकुळ झाले आहेत. पंढरीच्या विठुरायाची ओढ लागली आहे. या ओढीनेच लाखो भाविक संतांच्या पालखीत सहभागी होऊन ऐसा ‘सांडुनि सोहळा । मी का पडेल निराळा ॥’ हा भक्तीभाव मनाशी घेऊन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देहुत दाखल झाले आहेत. प्रस्थानाच्या मुख्य सोहळ्याला दुपारी अडीच वाजता सुरूवात होणार आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानने सोहळ्याचा कार्यक्रम जाहिर केला आहे. मानाच्या दिंड्या, फडकरी, सेवेकरी, चोपदार मंडळी देहुत दाखल झाले आहेत. बाभुळगावकरांचे मानाचे अश्‍व दाखल झाले आहे.

परंपरेप्रमाणे महाराजांच्या पादुका पॉलीशसाठी गावातील घोडेकर सराफ यांच्या घरी दाखल झाल्या आहेत. संस्थानच्यावतीने मंदिर परिसरात 34 सीसीटीव्ही कॅ मेरे लावण्यात आले आहेत. प्रदक्षिणा मार्गावर रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनबारी सफा क रण्यात आली आहे. दक्षिण दरवाजाकडील नवीन रस्ता खुला करण्यात आला आहे.

पोलीस यंत्रणा सज्ज
पालखी सोहळयात सर्वप्रकारच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. एक उपविभागीय पोलीस अधिकारी, सात पोलीस निरीक्षक, 19 सहाय्यक/ उपनिरीक्षक, 130 कर्मचारी, 75 महिला पोलीस, 70 वाहतुक पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाची एक पलटण, आरसीएफचे एक पथक, तसेच चार सशस्त्र जवान या सोहळ्यात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. या शिवाय गृहरक्षक दलाचे दोनशे क र्मचारी, खासगी कंपन्यांचे सुरक्षारक्षक, पुण्यातील विविध महाविद्यालयांतील एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी यांचीही मदत घेण्यात आली आहे.

आरोग्य विभागाची तयारी
जिल्हा आरोग्य विभागाने यात्रेकरूंच्या सेवेसाठी वि विध उपाययोजना केल्या आहेत. गाथा मंदीर, मुख्य मंदिर, वैकुंठस्थान, ग्रामपंचायत कार्यालय आदी मुख्य गर्दीच्या ठिकाणी सुमारे पाच बाह्यरुग्ण विभाग सुरू केले आहेत. प्रातमिक आरोग्य केंद्रात बाह्यरुग्ण आ णि आंतररूग्ण सेवा चोवीस तास सुरू राहणार आहे. विविध लसी, सर्पदंशावरील लस आदी पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. गावातील पाण्याचे सर्व स्त्रोत नियमीतपणे तपासले जात असून पाण्याचे नमुने तपासले जात आहेत. नदीच्या पाण्यात प्रमाणशीरपणे टीसीएल मिसळण्यात आले आहे. रुग्णांना तातडीच्या गरजेसाठी सुमारे पाच रुग्णवाहिका उफलब्ध करून देण्यात येणार आहेत.

ग्रामपंचायतीकडून सर्व कामे पूर्ण
देहु ग्रामपंचायतीकडून गावातील स्वच्छतेकडे मुख्यत्वे लक्ष दिले जाते. सर्व रस्ते, इंद्रायणीचे दोन्ही घाट चक ाचक करण्यात आले आहेत. निर्मलवारी संकल्पनें तर्गत गावात मोक्याच्या ठिकाणी 500 तात्पुरती शौचालये उभारण्यात आली आहेत. तिर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत गावात पे अ‍ॅन्ड युज या तत्वावर सुमारे 260 स्वच्छतागृहे यात्राकाळात मोफत उपलब्ध आहेत. गावातील हॉटेल्स, उपहारगृहे आणि चहा- वडापाव विक्रेत्यांना स्वच्छता आणि शुध्द वस्तु वापराच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून यात्राकाळात चोवीस तास पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात येणार आहे. एकंदरीतच सर्व पातळ्यांवर यंत्रणा सज्ज झाली आहे.

वारी विविध संकल्पांची, उपक्रमांची  
महाराष्ट्राच्या विविध भागांतून संतांच्या पालख्या आषाढा यात्रेनिमित्त पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरात येतात. संतांच्या पालख्यांसोबत लाखो भाविक-वारक री सोहळ्यात सामील होतात. या लाखोंच्या गर्दीत शासन, प्रशासन, सामाजिक संस्थांकडून अनेक संक ल्प, उपक्रम राबवून जनजागृती केली जाते. एकप्रक ारे आजकाल हि संकल्पांची आणि उफक्रमांची वारी ठरू लागली आहे. ‘आषाढी-कार्तिकी विसरू नका मज । सांगतसे गुज पांडुरंग॥’ अशा शब्दांत वारीचे महत्व सांगितले आहे. हाच भक्तीभाव घेऊन सोहळा सुमारे 333 वर्षे अव्याहतणे सुुरू आहे. किंबहुना तो वर्षानुवर्षे वाढत चालला आहे. लाखोंचा समाज या सोहळ्यात सहभागी होऊ लागला आहे. त्यामुळेच या सोहळ्याकडे शासनाचे विशेष लक्ष असते. वारक र्‍यांप्रमाणेच शासकिय यंत्रणाही महिनाभर आधीच तयारीला लागताना दिसते. मग वारीत वारकर्‍यांच्या सेवा-सुविधांसह जनजागृतीचे अनेक उपक्रमही राब विले जातात. निर्मलवारी, कुटूंब नियोजन, हरितवारी, हागणदारी मुक्ती, बेटी-बचाव असे अनेक उपक्रम शासनाने वारीच्या निमित्ताने आजवर राबविले आणि यशस्वी केले. यावर्षीही शासनाचे काही उपक्रम वारीत राबविले जाणार आहेत.

योजनांची माहिती देणारी ‘संवादवारी’
राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने शासनांच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी ‘संवादवारी’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये एलईडी स्क्रिनवर दृक्श्राव्य माध्यमातून तसेच पथनाट्यांद्वारे ही माहिती दिली जाणार आहे. त्यासाठी मोबाईल व्हॅन, प्रदर्शन, कलापथक, पथनाट्य, मोठा चित्ररथ यांचा वापर क रण्यात येणार आहे. पोलीस दलाच्यावतीने वारीत एलईडी स्क्रीनवर सुरक्षेबाबत खबरदारीचे उपाय याबाबत जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी एलइडी व्हॅन, ध्वनीचित्रफित आदीचा वापर करण्यात येणार आहे. यावर सतर्कतेच्या सूचना देण्यात येणार आहेत. याबाबतची एक ऑडीओ क्लिप ग्रामीण पोलिसांनी जारी केली असून, ती देहु-आळंदी येथे संपूर्ण यात्रा काळात ऐकविली जाणार आहे.

संकल्पांची वारी
फेसबुक दिंडी ही व्हर्च्युअल वारीची संकल्पना गेली आठ वर्षे काही तरूणांकडून राबविली जात आहे. या दिंडीला देशासह परदेशातूनही चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या पाठबळाच्या जोरावर या दिंडीतही आता विधायक संकल्पना राबविल्या जात आहे. ‘हरितवारी’ ‘झाडे लावा’, ‘वारी ती’ची अशा संकल्पनांच्या यशानंतर यावर्षी ‘नेत्रवारी’ ही संक ल्पना घेऊन ही दिंडी वारीत सहभागी होत आहे. संपूर्ण सोहळ्यात नेत्रदानाचे महत्व पटवून नेत्रदानाचे अर्जही भरून घेतले जाणार आहेत. इंडो सायकलिस्ट क्लबतर्फे आरोग्याचा संदेश घेऊन पुणे ते पंढरपूर अशी सायकल यात्रा (वारी) काढण्यात येणार आहे. या अनोख्या वारीत देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे क र्मचारी श्याम चौहान हे देहूरोड येथुन प्रतिनिधीत्व क रणार आहेत. पिंपरी-चिंचवड परिसरातील आयटी क्षेत्रात काम करणार्‍या तरूणांकडून ‘आयटी वारी’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. यामुळे यावर्षीची वारी जनजागृती साधण्यासाठी संकल्पांची वारी ठरणार आहे.

पावसाच्या सरी मागुन सरी…आनंदले वारकरी
गेल्या दोन दिवसांत पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. देहुत पालखी प्रस्थान सोहळयासाठी राज्यभरातून दिंड्यांचे, वारकर्‍यांचे आगमन सुरू आहे. पावसात चिंब भिजलेल्या वारकर्‍यांच्या चेहर्‍यावर भक्त ीचा भाव ओसंडून वाहताना दिसत आहे. मुखातून निघणार्‍या ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोषातून तो जाणवत आहे. जून महिना तसा कोरडाच गेला. मात्र, जुलैच्या पहिल्याच दिवसापासुन पाऊस सुरू झाला. सरी मागुन सरी झरझर बरसु लागल्या आहेत. प्रस्थान सोहळा अवघ्या काही तासांवर असल्यामुळे राज्यभरातुन वारकरी दिंड्या आणि भाविक देहुत दाखल होऊ लागले आहेत. मागील दोन दिवसांपासून ही लगबग सुरू आहे. मात्र, दोन्ही दिवसांत पावसाच्या सरी कोसळत आहेत. क्षणाची उसंत न घेता आणि पावसाची फिकीर न करता वारकरी देहुकडे जाताना दिसत आहेत. देहूरोड रेल्वेस्थानक ते देहु हा सुमारे चार किलोमीटर अंतराचा रस्ता भाविक गर्दीने फुलून गेला आहे.

दिंड्यांची खासगी वाहने तसेच सार्वजनिक बससेवा, रेल्वेगाड्या, खासगी प्रवासी वाहने, रिक्षा, सहाआसनी आदी वाहनांतुन भाविक देहुकडे जात आहेत. पायी जाणार्‍या भाविकांची संख्या त्याहुनही अधिक आहे. राज्य परिवहन मंडळाने देहुसाठी विविध मार्गावरून जादा बसगाड्या सोडल्या आहेत. पीएमपीएमपीएलनेही स्वारगेट, पुणे स्टेशन आदी मार्गांवरून विशेष यात्रा स्पेशल बसगाड्या देहुकडे सोडल्या आहेत. खासगी प्रवासी वाहतुकही जोमात आहे. देहु दाखल झाल्यावर भविक भंडारा डोंगरावरही दशरन घेण्यासाठी जात आहेत. त्यामुळे या मार्गावरही भाविकांची वर्दख वाढलेली दिसत आहे. तळेगाव येलवाडी मार्गे देहु हा रस्ता एकंदरीतच भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. रस्त्याच्या दुतर्फा विस्तीर्ण शेती, काळ्या भुईतून डोकावणारी हिरवीगार कोवळी पीके आणि रस्त्याने जाणार्‍या वारकर्‍यांचे टाळ-मृदुंगाचे आवाज असे भारावरणारे वातावरण नादब्रम्हाची अनुभूती देत आहेत.

दिंड्यांच्या मुक्कामांची माळराने गायब
देहुच्या आजुबाजुच्या परिसरात सिमेंटच्या जंगलाने आपले हातपाय पसरले आहेत. त्यामुळे वर्षानवर्षे देहुकरांना विविध पिकांच्या माध्यमातुन अन्नपुरवठा क रणारी काळी सुपिक जमीन केव्हाची गायब झाली आहे. मोकळी जमीनच न उरल्यामुळे यावर्षी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी देहुत दाखल झालेल्या दिंड्यांच्या मुक्कामाची आबाळ झाली आहे. मात्र, या परवडीबद्दल कुठलीही कुरकुर न करता दिंड्यांनी मुक्क ामाचे वेगळे पर्याय शोधले आहेत. मागील पाच दहा वर्षात देहु ग्रामपंचायत हद्दीत नागरीकण झपाट्याने वाढले आहे. गावाच्या सभोवतालच्या भागात असणारी शेतजमीन बिल्डरांनी खरेदी करून त्यावर टोलेजंग इमारती उभारल्या आहेत. विठ्ठलनगर, माळीनगर, वडाचा माळ या गावालगतच्या भागात सर्रास गृहप्रक ल्प उभे राहिले आहेत. परिणामी येथे मोकळ्या जागाच उरल्या नाहीत. त्यातच तिर्थक्षेत्र विकास आराखड्यांर्गत काही जागांवर सरकारी कामे झाली तर काही जागा खासगी असल्याचे कारण देत नाग रिकांनी कुंपण घालून त्या सुरक्षित केल्या आहेत. यात्रेसाठी देहुत येणार्‍या वारकरी दिंड्यांच्या मुक्क ामासाठी त्यामुळे जागाच शिल्लक राहिली नाही. अगदी पाच वर्षांपुर्वी येथील माळरानांवर दिंड्यांचे फड उतरायचे. राहुट्या उभारल्या जायच्या, मुख्य मंडपात पारायणे व्हायची. पण हे चित्र सध्या दुर्मिळ झाले आहे.

दोन मजली भक्तनिवास बांधले
या संदर्भात ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसूरकर म्हणाले की, ग्रामपंचायतीच्यावतीने वारकर्‍यांसाठी जिल्हा परिषदेच्या दोन शाळांच्या वर्गखोल्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय गावात काही धर्मशाळांमध्ये नियमीत मुक्काम असणार्‍या दिंड्या आहेत. गावाजवळ काही मंगल कार्यालयांतही वारक र्‍यांची मुक्कामाची सोय करण्यात आली आहे. तिर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत वैकुंठस्थान मंदिराजवळ दोन मजली भक्तनिवास बांधण्यात आले आहे. मात्र, ते अद्यापही राज्य शासनाच्या ताब्यात असल्यामुळे भा विकांसाठी खुले करण्यात आले नाही. गाथा मंदिर व्यवस्थापनाच्यावतीने भक्तनिवास उभारण्यात आले आहे. सरकारी सूचना देणारे ध्वनीक्षेपक आणि वि विध अन्नदान मंडळांचे तसेच काही व्यावसायिकांकडून साहित्य विक्रीसाठी लावण्यात येणारे ध्वनीक्षेपक यांचा अपवाद सोडल्यास सबंध देहुत भक्तीमय वातावरण निर्माण करणारे कीर्तनाचे स्वर, टाळमृदंगाचा निनाद आणि वीणेचे झंकार यांनी कान तृप्त करणारे आवाज आता मात्र, दुर्मिळ झाले आहेत.