चाळीसगाव। विविध शैक्षणिक अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाले असून पुढील वर्गात प्रवेशासाठी विविध कागदपत्राची आवश्यकता विद्यार्थ्यांना आहे. कागदपत्रे काढण्यासाठी विद्यार्थी प्रांताधिकारी कार्यालयात चकरा मारत आहे. मात्र प्रांताधिकारी हजर राहत नसल्याने विद्यार्थ्यांना कागदपत्रे मिळण्यास उशीर होत आहे. प्रातांधिकारी सुटीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. विविध शालेय अभ्यासक्रमासाठी नोंदणी मुदतीत करावयाच असल्याने विद्याथ्यार्ंची कागदपत्रासाठी धावपळ होत आहे. प्रांत कार्यालयात या दाखल्यांसाठी तात्पुरत्या स्वरुपात दुसर्या अधिकार्यांची नियुक्ती करावी त्याच प्रमाणे दाखले देण्यासाठी ग्रामीण भागातील तलाठ्यांना त्याच्या सजेवर हजर राहून विद्यार्थ्यांना तत्काळ दाखले देण्याचे आदेश करावेत असे न झाल्यास रयत सेनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. मागणीचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले.
कागदपत्रा अभावी प्रक्रिया रखडली
दहावी, बारावी निकाल जाहीर झाले असून पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना कागदपत्राची आवश्यकता आहे. कागदपत्राशिवाय पुढील अभ्यासक्रमाची नोंदणी होत नसल्याने पुढील प्रक्रिया रखडली आहे. वैद्यकिय तसेच अभियांत्रिकीय प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता आहे मात्र चकरा मारुन देखील प्रमाणपत्र मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांची हिरमुड होत आहे.
यांच्या आहेत स्वाक्षर्या
निवेदनावर गणेश पवार, जिल्हाध्यक्ष संजय कापसे, दिपक राजपूत, सुर्यकांत कदम, ज्ञानेश्वर कोल्हे, राजेश पाटील, पंकज पाटील, मयूर चौधरी, पप्पू पाटील, मुकुंद पवार, समाधान मांडोळे, किशोर पाटील, अनिल पाटील, महेश पवार, अशोक चव्हाण, निंबा जगताप, निंबा पाटील, अनुप देशमुख, वाय.एम.पाटील, विशाल जाधव, भूषण पाटील, सुनील निंबाळकर, बाबासाहेब पगार, प्रदीप मराठे, राजेंद्र पगार, विजय शितोळे, संजय नवले, विलास मराठे, भाऊसाहेब देशमुख, संजय वाघ, कैलास माने आदींची स्वाक्षरी आहे.
मृत्यु प्रकरणी कारवाईची मागणी
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील म्हसा विद्युत मंडळाच्या गलथान कारभाराने अभियंत्याच्या अंगावर 10 रोजी रात्रीच्या सुमारास विजेच्या तारा पडुन मृत्यू झाल्याने दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी रयत सेनाच्या वतीने निवेदनाद्वारे ऊर्जा मंत्री यांच्या कडे तहसिलदार चाळीसगाव यांच्यामार्फत करण्यात आले. योगेश कुर्ले यांच्या अगावर विज तारा अंगावर पडल्याने मृत्यु झाला होता. मयताच्या कुटुंबीयास आर्थिक मदत करण्याची मागणी त्यांनी केली.