प्राचार्य, संस्था सर्रास घेतात कोरे धनादेश

0

तळोदा । भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेत महाविद्यालयाचे प्राचार्य विद्यार्थ्यांकडून शक्तीने वसूल करीत असलेल्या रक्कमेबाबत व घेत असल्या कोर्‍या धनादेशाबाबत संस्था, महाविद्यालयांचे प्राचार्यांना ताकीद देऊन फौजदारी कार्यवाही करण्यात येईल अशी सूचना देण्यात यावी असे आशयाचे पत्र नाशिक विभाग नाशिक अप्पर आयुक्त यांच्याकडून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा यांना देण्यात आले आहे.

फौजदारी गुन्हा दाखल करा
7 एप्रिल 2018 रोजी नर्सिंग प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीच्या शिष्टमंडळाने अपर आयुक्त , आदिवासी विकास , नाशिक यांचे प्रत्येक्ष भेट घेतली भेटीमध्ये विध्यर्थिनींनी खालील प्रमाणे तक्रारी केल्या. भारत सरकार शिष्यवृत्ती या योजनेच्या माध्यमातून डीबीटीद्वारे नर्सिंगचे प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात आदिवासी विकास विभागाकडून वर्ग करण्यात येणारी रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बचत खात्यावर जमा होते. परंतु, नर्शिंग प्रशिक्षण देणारी संस्था, महाविद्यालये विद्यार्थ्यांचे भारत सरकार शिष्यवृत्तीच्या बँक खात्याचे कोरे धनादेश , पासबुक, एटीम कार्ड व इतर अनुषंगीक कागदपत्रे सक्तीने स्वतःकडे घेत आहेत. शासन निर्णयात नमूद प्रमाणे विद्यार्थ्यांना बँक खात्यावर प्राप्त होणारी भारत सरकार शिष्यवृत्तीची रक्कम ही विद्यार्थाने स्वतः काढून महाविद्यालयास देणे क्रमप्राप्त आहे. यामुळे अशा प्रकारची नियमबाह्य कृती करणार्‍या संस्था, महाविद्यालयांचा प्राचार्यांनाताकीद देऊन असे कृत्य करणार्‍या संस्था, महाविद्यालयाविरुद्ध फौजदारी कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे.