खूनाचे वाढीव कलम लावले ; सातही संशयितांना दोन दिवसांची वाढीव कोठडी
जळगाव : मित्राचा वाद मिटविण्यासाठी गेलेल्या राहुल व सुमीत बोरसे या दोघांवर धारदार चाकूने हल्ला केल्याची घटना 17 रोजी रात्री सव्वाअकराच्या सुमारास गांधीनगरात घडली होती. यात जखमी दोघा भावांपैकी सुमितची प्रकृती गंभीर होती. त्याच्या शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. उपचार सुरु असताना पाचव्या दिवशी बुधवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास सुमितची प्राणज्योत मालवली. दरम्यान पोलिसांनी या गुन्ह्यात खुनाच्या कलमांचा समावेश केला असून अटकेतील 7 संशयितां न्यायालायने पुन्हा दोन दिवसांची वाढीव कोठडी सुनावली आहे.
गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास गांधीनगरातील डॉ. नवाल यांच्या गल्लीत काही तरुण लगोरी खेळत होते. खेळतांना समोरुन येणार्या देवेन मनोहर चौधरी याला लगोरीचा बॉल लागल्याने त्याने आरोळी मारत, नीट खेळा..रे असे सुनावल्याचा राग येवुन या तरुणांनी त्याची दुचाकी थांबवून लाथा मारल्या. देवेन चौधरी याला मारहाण होत असल्याने त्याने मित्र राहुल सुरेश बोरसे याला फोन केल्याने त्याचा भाऊ सुमित आणि इतर मित्र, बर्थडेचा कार्यक्रम सोडून तेथे पोचले. तरुणांच्या वादाचे रुपांतर हाणामारीत होवुन, एकाने राहुलच्या कंबरेत चाकु मारल्याने भाऊ सुमित याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केल्यावर त्याच्या छातीत समोरुन चाकु खुपसण्यात आला होता. जखमी दोघा भावंडावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतांना आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास सुमितला झटके येत असल्याने डॉक्टरांनी क्रिटीकल केअर सेंटरला हलवण्याचा सल्ला दिला. कुटूंबीयांनी तत्काळ शाहुनगर येथील सहयोग क्रिटीकल येथे हलवल्यानंतर उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यु ओढवला. गेली सहा दिवस सुमतीच्या प्रकृतीत सुधारणा होत होती, मात्र..छातीत मधोमध खोलवर चाकू खुपसल्याने नाजुक अवयवांना इजा पोहचल्याने आज अचानक त्याची प्रकृती खालावली, आणि त्याचा त्यात मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगीतले.
उद्या सकाळी सुमितवर अंत्यसंस्कार
समितचा मृत्यु ओढवल्याचे कळताच वडील सुरेश बोरसे यांच्यासह कुटूंबीयांनी प्रचंड आक्रोश केला. कोणाशी स्वत:च भांडण तंटा नसतांना, मुलगा गमावल्याने आईवडीलांचा रडून रडून बेहाल झाले. ज्याने फोन करुन आमच्या पोरांना बोलावले त्याला आणि ज्याने चाकु मारला त्याला आत्ताच आमच्या हवाली करा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही असाही पावित्रा काहींनी घेतला. आता आम्हाला न्याय हवा…ते सुटायला नको अशी मागणी लावून धरली मात्र, बोरसे कुटूंबातील समजुतदार सदस्यांनी पोलिसांना सहकार्य केल्याने पंचनामा होवुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. सुमीतचा चुलत भाऊ सौदी अरेबीया येथे नोकरीला असून तो येण्यासाठी निघाला असल्याने सुमीतवर उद्या सकाळी शवविच्छेदन होवून अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
संशयीतांना दोन दिवसांची कोठडी
प्राणघातक हल्ला प्रकरणी दाखल गुन्ह्यात तपासाधिकारी संदिप अराक यांनी चेतन अनिल भालेराव (वय 21), आकाश प्रकाश सपकाळे (वय 21) व विजय देवेंद्र बाविस्कर (वय 19, तिघे रा. विवेकानंद नगर) हर्षद रमेश जैन (वय 25), दर्शन ऊर्फ बाला बाबूलाल जैन (वय 21 दोन्ही रा. गांधीनगर, जिल्हापेठ), अंकित राजेंद्र धर्माधिकारी (वय 19 रा. गोदावरी भवन गांधीनगर) व संकेत रिशी पांडे (वय 21 रा. नंदनवन कॉलनी) यांना रविवारी अटक केल्यानंतर तीन दिवसांची कोठडी मिळाली होती, कोठडीची मुदत संपल्याने आज पुन्हा संशयीतांना न्यायालयात हजर केल्यावर न्या.पी.सी.पाटिल यांच्या न्यायालयाने अतिरीक्त दोन दिवस 24 मे पर्यंत कोठडी सुनावणी आहे. सरकारपक्षातर्फे अॅड. आर.पी गावीत यांनी कामकाज पाहिले.