जळगाव । उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने एप्रिल 2017 मध्ये घेतलेल्या टी.वाय.बी.एस्सी वर्गाच्या परिक्षेमध्ये नुतन मराठा महाविद्यालयाची विद्यार्थिनी मयुरी शशिकांत शिंदे हिने 95 टक्के गुण मिळवून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून प्रथम येण्याचा मान मिळविला. तसेच कु. रुचीका निंबाळकर या विद्यार्थिनीने रसायनशास्त्र विषयात 95 टक्के गुण मिळवून महाविद्यालयात रसाशनशास्त्र विषयाची परंपरा कायम ठेवली. मयुरी शिंदे व रुचिका निंबाळकर यांचा सत्कार संस्थेच्या व महाविद्यालयाच्यावतीने संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी संचालक अॅड. विजय पाटील, अण्णासाहेब कापसे, प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख, उपप्राचार्य आर.बी.देशमुख, डॉ.पी.बी.पाटील, प्रा.डॉ.माधुरी पाटील, शशिकांत शिंदे, निता शिंदे, प्रभाकर शिंदे, वसंतराव शिंदे, सुनिल शिंदे उपस्थित होते.