पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या प्राथमिक शाळामधील शिक्षकांना गृहकर्ज योजना लागू करण्यात यावी, अशी सूचना महापौर नितीन काळजे यांनी आयुक्तांना केली आहे.
याबाबतच्या मागणीचे निवेदन आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहे. त्यात म्हटले आहे की, गृहकर्ज योजना मागील दहा वर्षांपूर्वी प्राथमिक शिक्षकांसाठी बंद करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांना स्वत:चे घर घेण्यास अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे ही योजना प्राथमिक शिक्षकांना पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी सूचना केली आहे.