पिंपरी-चिंचवड- प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीच्या पाहणीनुसार रस्ते अपघातामध्ये पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दोन वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रमुख चौकांमध्ये अपघातांच्या संख्येत वृद्धी नोंदविण्यात आली आहे. पिंपरी आणि चिंचवड परिसरात गेल्या दोन वर्षात १८९ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तर ८४० जण जखमी झाले आहे.
अपघातांचे गांभीर्य लक्षात घेऊन दुचाकी चालकांनी हेल्मेट वापरणे सुरक्षिततेच्या दृष्टीने आत्यावशक आहे. याकरिता महाराष्ट्र पोलीस दलाच्या ६९ व्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या वतीने शनिवार ५ जानेवारी रोजी हेल्मेट वापरण्याकरिता जनजागृती अभियान राबविले गेले. यावेळी शहराचे सहआयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलिस आयुक्त राम जाधव, निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक सीता वाघमारे यांनी मार्गदर्शन केले.
जनजागृतीच्या व पोलीस स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या शिष्टमंडळाने सह आयुक्तांची नूतन आयुक्तालायमध्ये भेट घेतली व शुभेछा दिल्या. या प्रसंगी राज्य समिती अध्यक्ष विजय पाटील, संपर्क प्रमुख विजय मुनोत, महिला अध्यक्ष अर्चना घाळी, विभागप्रमुख बाबासाहेब घाळी, संतोष चव्हाण, शुभम वाघमारे उपस्थित होते.