जळगाव । महाविद्यालयात काम करीत असताना प्राध्यापकांनी आणि कर्मचार्यांनी सेवाभाव जोपासणे महत्वाचे असते. समर्पण, त्याग, देण्याची वृत्ती, सेवा या गुणांनी प्रत्येकजण परिपूर्ण बनतो, असे प्रतिपादन मू.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी यांनी केले.
येथील मू.जे.महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.पी.डी.भोळे, उपप्राचार्य डॉ. नंदकुमार भारंबे, वरिष्ठ लिपिक श्री.सुभाष सगळगिळे, प्रयोगशाळा परिचर श्री.शरद अत्तरदे हे सोमवारी 31 जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. यानिमित्त झालेल्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी यांच्यासह उपप्राचार्य डॉ.देवयानी बेंडाळे, डॉ.ए.पी.सरोदे आणि सेवानिवृत्त सत्कारमूर्ती उपस्थित होते.
गुंतवणुकीचा समजविला सारासार विवेक
यावेळी सेवानिवृत्तांबाबत प्रा.डॉ.सुरेश तायडे, प्रा.संजय हिंगोणेकर, प्रा.शिल्पा सरोदे, डीप्पर संस्थेचे संस्थापक सचिव हरीश बुटले, प्रा. गणेश सूर्यवंशी, श्री.राजेश बागुल, श्री.नितीन पाटील, आरती चौधरी यांनी कृतज्ञता व्यक्त करून आपल्या भावना मांडल्या.यावेळी मनोगतात प्रा.पी.डी.भोळे, सुभाष सगळगिळे, शरद अत्तरदे यांनी सांगितले की, महाविद्यालयाने आम्हाला खूप काही दिले असून मोठे केले आहे. श्रम प्रतिष्ठा, शिस्तबद्धता जोपासत महाविद्यालयात विद्यार्थ्यांवर संस्कार केले. महाविद्यालयाप्रती ऋण व्यक्त करून सत्कारमुर्तीनी यापुढेही महाविद्यालयाशी ऋणानुबंध कायम राहील, असे सांगितले. सूत्रसंचालन व आभार प्रा. योगेश महाले यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.