प्राध्यापक निरुक्तीप्रकरणी डॉ.श्रीपाल सबनीस यांना न्यायालयाचा दणका

0

जळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले प्रा.डॉ.श्रीपाल सबनीस यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील भाषा प्रशाळा, संशोधन केंद्राचे संचालक व मराठी भाषा विभागप्रमुख डॉ.म.सु.पगारे यांची उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्राध्यापक पदी झालेली नेमणूक अयोग्य असल्याचे सांगत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. 7 नोव्हेबर रोजी याचिकेवर सुनावणी झाली.

न्यायालयाने प्रा.पगारे यांची नियुक्ती योग्य असल्याचा निर्णय देत डॉ.सबनीस यांना दणका दिला आहे. प्रा.डॉ.म.सु.पगारे यांची 14 फेबु्रवारी 2010 रोजी प्राध्यापकपदी नियुक्ती करण्यात आली होती. 2012 मध्ये डॉ.सबनीस यांनी त्यांच्या नियुक्ती अयोग्य असून नेमणूक रद्द करण्यात यावी यामागणीसाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. गेल्या पाच वर्षापासून न्यायालयात प्रलंबीत असलेल्या या याचिकेच्या बाजूने अजिंक्य काळे, एस.बी.तळेकर यांनी तर राज्यपाल व सहसंचालक यांच्यावतीने बी.ए.शिंदे यांनी काम पाहिले होते. विद्यापीठ व कुलगुरु यांच्यातर्फे योगेश बोलकर यांनी कामकाज पाहिले.