प्रायोगिक जलसंधारण प्रकल्पाबाबत अमिरखान यांना निमंत्रण

0

धुळे । जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष मुकुंद कोळवले यांनी आपल्या कोळवले नगरात स्वखर्चाने मोठा जलप्रकल्प साकारला आहे. धुळे शहरानजीक असलेल्या लळींग कुरणातून उगम पावणार्‍या नाल्यावर मोठा बंधारा बांधून तेथे जलसाठा अडविल्याच्या प्रकल्पाबाबत माहिती देण्यासाठी अमिरखान यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यावेळी जितेश कोळवले, दीपक गवळी व कोळवले नगरातील युवा कार्यकर्ते उपस्थित होेते. अमिरखान यांनी धुळ्यात हॉटेल कृष्णा रिजन्सी येथे आपल्या अभियानाबाबत माहिती देण्यासाठी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ही औपचारिक भेट घेण्यात आली.

स्वखर्चाने साकारला जलप्रकल्प
शहरातील जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष मुकुंद कोळवले यांनी आपल्या कोळवले नगरात स्वखर्चाने मोठा जलप्रकल्प साकारला आहे. धुळे शहरानजीक असलेल्या लळींग कुरणातून उगम पावणार्‍या नाल्यावर मोठा बंधारा बांधून तेथे जलसाठा अडविला आहे. त्यामुळे त्या तलावात भरपूर पाणी साठले आहे. जलप्रकल्पात कोळवले यांनी माशांच्या विविध जाती सोडल्या आहेत. त्यातून मोठे मत्स्य उत्पादन होत आहे. तलावाच्या परिसरात घनदाट वृक्षराई फुलविण्यात आली आहे. या जलप्रकल्पामुळे जवळपास 5 किलोमीटर परिसराला जलस्त्रोत प्राप्त झाले आहेत. त्यामुळे विहिरींनाही पाणी आले असून परिसरातील पाणी टंचाई दूर झाली आहे.

12 एकर जमिनीत 23 लाखाची पदरमोड
महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागाने प्रकल्पाला मंजूरी दिली असून मुकूंद कोळवले यांनी या प्रकल्पावर 23 लाख रुपये पदमोड केली आहे. तसेच जलप्रकल्पासाठी स्वत:ची 12 एकर जमीन प्रदान केली आहे. या जमिनीवर भेंडी, काकडी, मुळा, गंगाफळ तसेच फळभाज्या, पालेभाज्यांची लागवड केलेली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे शासकीय पातळीवर व नागरीस्तरावर मोठे कौतुक झाले आहे. सबब आपण स्वत: येथे येवून जलप्रकल्पाची पाहणी करावी, जेणे करुन आपण छेडलेले जलसंधारणाचे अभियान पुढे नेता येईल व माझ्या जलप्रकल्पाची माहिती इतरांनाही देऊन त्यांच्यापुढे आदर्श उभा करता येईल, असे आग्रहाचे निमंत्रण मुकूंद कोळवले यांनी अभिनेता अमिरखान यांना धुळे भेटी दरम्यान दिले.