शेंदुर्णी । येथील गरुड महाविदयालयातील हिंदी विषयाचे प्रा.आर.डी.गवारे यांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठकडून पीएच.डी. पदवी मिळाल्याबद्दल कुलगुरु प्रा.डॉ.पी.पी.पाटील यांच्याहस्ते गौरविण्यात आले. ’संजीव और भास्कर चंदन शिव की कहानीयो मे समसामायीक समस्या ओका चित्रण : तुलनात्मक अध्ययन’ या संशोधनाच्या विषयावर संशोधन प्रबंधात त्यांनी उत्तर भारत व महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक व धार्मिक समस्यांचा तुलनात्मक अभ्यास करुन निष्कर्ष मांडले आहेत.
स्वातंत्र्योत्तर भारतात शेतकरी, मजूर, आदिवासी आणि स्त्री या वर्गाचे प्रस्थापित व्यवस्थेकडून कशा प्रकारे सातत्याने शोषण होत आहे. याप्रसंगी विषय अध्यक्ष डॉ.मृदला वर्मा व पीएच.डी.मार्गदर्शक उमवि हिंदी विभाग प्रमुख डॉ.सुनिल कुळकर्णी उपस्थित होते. त्यांचे संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड, सचिव सागरमल जैन, सहसचिव दिपक गरुड, प्राचार्य डॉ.वासुदेव पाटील, उपप्राचार्य प्रा.एन.एस.सावळे, प्रा.आर.जी. पाटील, सहकारी प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी डॉ आर.डी.गवारे यांच्या या यशा बद्दल अभिनंदन केले.