प्रा. डॉ. राजेंद्र ठाकरे यांना शिक्षणतज्ञ पुरस्कार

0

जळगाव: फैजपुर येथील धनाजी नाना महाविद्यालयातील व्यावसायिक अर्थशास्त्र व बँकिंग विभाग प्रमुख प्रा़ डॉ़ राजेंद्र ठाकरे यांना नुकताच डॉ़ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय परिषदेतर्फे शिक्षणतज्ञ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

हा पुरस्कार सोहळा मुंबई येथे पार पडला़ यावेळी आंतरराष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष डॉ़ सनी शाह यांची प्रमुख उपस्थिती होती़ ठाकरे हे गेल्या ३० वर्षांपासून धनाजी नाना महाविद्यालयात अध्यापन करीत आहेत़ त्यांनी अनेक विविध उपक्रमांमध्ये योगदान दिले आहेत़ सोबतच जनजागृती, प्रबोधन सुध्दा केले आहेत़ त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे़ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा शिरीष चौधरी, प्राचार्य डॉ़ पी़आऱ चौधरी, उपाध्यक्ष डॉ़ एसक़े़ चौधरी, प्रा़ एम़टी़फिरके, प्रा़ अनिल भंगाळे आदींनी अभिनंदन केले आहे.