प्रा. वासुदेव कुलकर्णी यांना पीएचडी

0

राजगुरुनगर : खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. वासुदेव कुलकर्णी यांना नुकतीच नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडून पीएचडी प्रदान करण्यात आली. कुलकर्णी यांचा पीएचडीचा विषय ’सिंथेसीस अ‍ॅन्ड कॅरेक्टरायझेशन ऑफ रेअर अर्थ ङर सबस्टीट्युड छळ – ले – 2प नॅनोफेराईट्स बाय सोल – जेल टेक्नीक’ असा आहे. त्यांना पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे डॉ. एस.एम.राठोड यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या यशाबद्दल खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. देवेंद्र बुट्टेपाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, मानद सचिव हरिभाऊ सांडभोर, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. एस.बी.पाटील, उपप्राचार्य डॉ. एच.एम.जरे, डॉ. संजय शिंदे, प्रबंधक कैलास पाचारणे, सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.