प्रा. संदीप बेडसे यांना भुजबळांचे समर्थन

0

धुळे । नाशिक विभाग शिक्षक मतदारसघं निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकपा, भाकप, मित्रपक्ष आघाडी व शिक्षक भरती पुरस्कृत टीडीएफचे अधिकृत उमेदवार प्रा. संदीप बेडसे हे लायक असून, त्यांना प्रचंड मतांनी शिक्षक मतदारांनी विजयी करावे, असे आवाहन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भुजबळ यांनी सोशल मीडियाद्वारे हे आवाहन केल्यानंतर प्रा. बेडसे यांना बहुतेक शिक्षक मतदारांना समर्थन मिळाले आहे. राष्ट्रवादी काँगे्रसचे सर्वसर्वा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी याआधीच प्रा. संदीप बेडसे यांना विजयासाठी आशीर्वाद दिला आहे. त्यात भरीस भर म्हणून भुजबळांनी साथ दिल्याने अधिक भर पडली आहे.

टीडीएफमधील फुट अपप्रचार
प्रा. बेडसे यांना प्रशासकीय सेवेचा, मंत्रालयीन कामकाजाचा चांगला अनभु व आहे. शिक्षकांच्या समस्या, शिक्षणक्षेत्रातील अतिशय बारकाईने त्यांना माहिती आहे. शिक्षक आमदार म्हणून ते यशस्वीरित्या कामकाज पाहतील. प्रशासकीय अनुभव तसेच शिक्षणक्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी ते अग्रेसर राहतील. अशा अभ्यासू व अनुभवी प्रा. बेडसे यांना भरघोस मतांनी विजयी करावे. टीडीएफमध्ये फूट पडली आहे, अनेक उमेदवार रिंगणात आहेत, असा अपप्रचार करून जी दिशाभूल केली जात आहे, त्या पार्श्‍वभूमीवर भुजबळ यांनी आपले मत यासंदर्भात व्यक्त केले आहे.