व्यवस्थापनाने सहानुभूतीने पाहून कामगारांना वेतन मिळणे गरजेचे
कामगार आयुक्तांना कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करण्याची सूचना
पिंपरी-चिंचवड : प्रिमियर लिमिटेड कंपनीच्या कामगारांचे गेल्या 50 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. या कामगारांची भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी भेट घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. याबाबत कामगार आयुक्तांना कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करण्याची सूचना केली आहे. लांडगे म्हणाले, कामगारांना न्याय मिळणे गरजेचे आहे. कंपनी व्यवस्थापनाने कामगारांकडे सहानुभूतीने पाहिले पाहिजे. कामगारांना वेतन देणे गरजेचे आहे. त्यांच्यावर कुटुंब अवलंबून असते. कामगारांची पिळवणूक होऊ नये, याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
पन्नास दिवसांपासून आंदोलन
मागील काही महिन्यांपासून कंपनीने कामगारांचे पगाराचे पैसे असूनही न देण्याचे धोरण अवलंबविले आहे. काही कामगारांना सेवानिवृत्त होऊनही सेवा वेतनाची रक्कम देण्यात आलेली नाही. त्यांचे भविष्यनिर्वाहनिधीचे अर्ज ही सादर करण्यात आले नाहीत. त्यामुळे कामगारांचे आर्थिक पिळवणूक कंपनीने सुरु केलेली होती. त्यामध्ये कंपनीचा कुटील कारस्थान असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. कंपनीस ही जागा परस्पर विकायची असल्याचे लक्षात आले आहे. पगाराबाबत व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार केला. मात्र, व्यवस्थापनाने दाद दिली नसल्याचा आरोप करत कामगारांनी आंदोलन सुरु केले आहे. या मागण्यांसाठी ते गेल्या 54 दिवसांपासून आंदोलन करत आहेत.
शुक्रवारच्या बैठकीला उपस्थित राहणार
या कामगारांची भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी भेट घेतली. यावेळी स्विकृत सदस्य पांडुरंग भालेकर, स्वीकृत सदस्य ‘फ’ क्षेत्रीय पांडुरंग साने, व विनायक मोरे आदी उपस्थित होते, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. याबाबत कामगार आयुक्तांना कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करण्याचे सूचना केली आहे. त्यानुसार कामगार आयुक्त कंपनीव्यवस्थापनाशी चर्चा करणार आहेत. या बैठकीला आमदार लांडगे देखील उपस्थित राहणार आहेत.