प्रियांकाची निकसाठी ‘थँक्सगिव्हिंग पार्टी’

0

मुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाची तारीख जवळ आली आहे. जोधपूरमध्ये हे दोघेही लग्नगाठ बांधणार आहेत. त्यापूर्वी प्रियांकाने खास निकसाठी ‘थँक्सगिव्हिंग’ पार्टीचे आयोजन केले होते.

लग्नसोहळ्यासाठी निक न्यूयॉर्कहून मुंबईत आला. प्रियांकाने त्याच्यासोबतचा एक खास फोटोही सोशल मीडियावर शेअर करुन ‘वेलकम होम बेबी’, असे कॅप्शन दिले होते. जोधपूरच्या उमैद भवनमध्ये त्यांचा ग्रॅन्ड विवाहसोहळा पार पडणार आहे. मोजके नातेवाईक आणि मित्रमंडळीच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडणार असल्याची माहिती मिळाली आहे.