प्रियांका आणि निकचा ४७ कोटींचा आशियाना

0

मुंबई : देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि पॉप सिंगर निक जोनास डिसेंबरमध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. लग्नाच्या आधीच या दोघांनी लॉस एंजलेसमध्ये आलिशान घर खरेदी केले आहे. लग्नानंतर प्रियांका आणि निक आपला नवा संसार त्यांची नवीन घरी थाटणार आहे. या घराची किंमत 48 कोटींच्या आसपास असल्याचे समजतेय. प्रियांका आणि निकच्या घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कॉलिफोर्नियामधल्या बेवर्ली हिल्स परिसरात हे घर आहे.

 

साडेचार हजार स्वेअर फिटचं हे आलिशान घर असून त्यात ५ बेडरुम्स, स्विमिंग पूल आणि अनेक आधुनिक सोयीसुविधा देखील आहे. घरात स्विमिंग पूल, गार्डन अशा सगळ्या गोष्टीत आहेत. 30 नोव्हेंबरपासून 2 डिसेंबरपर्यंत लग्नाच्या वेगवेगळ्या विधी होणार आहेत.