प्रियांका करतेय सलमानला खुश करण्याचा प्रयत्न

0

मुंबई : नुतकतेचं प्रियांकाने सलमान खानचा “भारत” हा सिनेमा सोडला होता. यावर सलमान प्रियांकावर थोडा नाराज असल्याचे चर्चा बॉलीवूड मध्ये पसरली होती. दरम्यान सलमानला खुश करण्यासाठी प्रियांकाने ट्विटवर त्याचा मेहुणा आयुष शर्माच्या ‘लवरात्री’ चित्रपटाबद्दल एक खास ट्विट केले आहे.

‘माझा मित्र आयुष शर्मा तुझे बॉलिवूडमध्ये स्वागत आहे. चित्रपटाचा ट्रेलर मी पाहिला आणि मला विश्वास आहे तू नक्कीच एक चांगला अभिनेता होशील’ असे ट्विट तिने केले आहे.

काहीदिवसांपूर्वी सलमानला प्रियांकाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा तो म्हणाला, प्रियांकाने भलतेच कारण सांगून चित्रपट सोडला आहे. आता प्रियांकाच्या या ट्विटने सलमानचा राग शांत होणार का नाही हे पाहणे औत्सुकाचे ठरेल.