नवी दिल्ली-कॉंग्रेसने प्रियंका गांधींची पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड केली आहे. या निवडीमुळे प्रियांका गांधी यांचा राजकारणात औपचारिक प्रवेश झालेला आहे. यावरून भाजपने कॉंग्रेसवर निशाना साधला आहे. प्रियांका गांधी यांची निवड ही राहूल गांधींच्या अपयशावर झालेले शिक्कामोर्तब आहे अशी टीका भाजपने केली आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी टीका केली आहे.
प्रियंका गांधी यांची सरचिटणीसपदी नियुक्ती केल्याची तसेच त्यांच्यावर पूर्व उत्तर प्रदेशमध्यमध्ये प्रचाराची जबाबदारी असेल अशी घोषणा आज काँग्रेसने केली आहे. या नियुक्तीमुळे ठराविक मतदारसंघाबाहेर सक्रिय राजकारणात उतरताना पहिल्यांदाच प्रियंका बघायला मिळणार आहेत.
भाजपा हे एक पक्षाचं कुटुंब आहे तर काँग्रेसमध्ये कुटुंबच पक्ष आहे. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी असा आत्तापर्यंतचा प्रवास असून आता प्रियंका गांधींची नियुक्ती हा फर्स्ट फॅमिलीचा राज्याभिषेक असल्याची टीका पात्रा यांनी केली आहे.