प्रियांका-निकच्या विरोधात ‘पेटा’ने घेतला आक्षेप !

0

मुंबई : बॉलीवूडची देसी गर्ल आता विदेशी सून झाली आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा जोधपूर येथील उमेद भवनामध्ये विवाहसोहळा पार पडला. यांच्या लग्नात प्राण्यांचा वापर केला गेल्यामुळे ‘पेटा’ या प्राणी सुरक्षा संस्थेने आक्षेप घेतला आहे. ‘पेटा’ (PETA)ने याबाबत प्रियांका आणि निकला उद्देशून एक ट्विट केले आहे.

प्रियांका निकच्या लग्नात हत्ती आणि घोड्यांचा वापर करण्यात आला. यासंबंधी ‘पेटा’ने त्यांच्या ट्विटमध्ये एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत लग्नात प्राण्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कशाप्रकारचे साधन वापरले जातात. त्यामुळे त्यांना कसा त्रास होतो, हे दाखवण्यात आले आहे. ‘तुम्हाला जरी तुमच्या लग्नाचा आनंद असेल, मात्र प्राण्यांसाठी हा दिवस नक्कीच चांगला नाही’, असे त्यांनी या ट्विटमध्ये लिहिले आहे.

‘पेटा’ने केलेल्या या ट्विटवर प्रियांका आणि निकची प्रतिक्रिया काय असेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.