मुंबई : प्रियांका चोप्रा काहीच दिवसात परदेशी सून होणार आहे. निक सोबत ती लग्नबेडीत अडकणार आहेत. सध्या त्यांच्या विवाह सोहळा सुरु आहे. दोनी फॅमिलीचे लोक विवाहस्थळी पोहोचले आहेत.
एका मुलाखतीत प्रियांकाने निकला कोणते नाव दिले आहे, हे सांगितले. ‘मी निकला ‘ओल्ड मॅन जोनस’ या नावाने हाक मारते, असे तिने सांगितले. माझ्या आणि त्याच्या वयात फार अंतर आहे. तो माझ्यापेक्षा लहान असला, तरी त्याचा स्वभाव हा खूप मॅच्युअर आहे. विशेष म्हणजे तो माझ्याही स्वभावाचा आदर करतो, आणि त्याची हीच गोष्ट मला फार आवडते’, असे प्रियांकाने या मुलाखतीत सांगितले. प्रियांका आणि निकच्या लग्नाच्या चर्चांमुळे सोशल मीडियावर ते टॉप १चे सेलिब्रिटी बनले आहेत.