मुंबई – अभिनेते संजय दत्त यांच्या बहिणी काँग्रेस नेत्या आणि माजी खासदार प्रिया दत्त यांना पक्षाने सचिवपदावरून पायउतार केले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव अशोक गहलोत यांनी दत्त यांना पत्र पाठवून या निर्णयाची माहिती दिली आहे. दरम्यान, मुंबई प्रदेश काँग्रेसच्या काल झालेल्या बैठकीत प्रिया दत्त यांना उत्तर-पश्चिम मुंबई मतदार संघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रिया दत्त यांच्या उमेदवारीस विरोध केला होता.
मागच्या महिन्यात चार सप्टेंबरला भारतीय हवाई दलाचे मिग-२७ फायटर विमान राजस्थान जोधपूरमध्ये एका शेतामध्ये कोसळले होते. सुदैवाने वैमानिक या अपघातात बचावला होता. जून महिन्यात गुजरात कच्छमध्ये हवाई दलाचे फायटर विमान कोसळले होते. या अपघातात भारताने आपले कुशल वैमानिक संजय चौहान यांना गमावले होते. नियमित सरावासाठी त्यांच्या विमानाने जामनगर हवाई तळावरुन उड्डण केले होते. या अपघातानंतर तीन दिवसांनी अहमदाबाद येथे हवाई दलाचे विमान कोसळले होते.