प्रिय अटलजी ,
मनाला ही गोष्ट अजून पटत नाही की अटलजी नाहीत मधूर वाणी कणखर राजकारणी ,पत्रकार ,कवी मनाचा माणूस असलेला राजधुरंधर नेता क्षितीजापार कायमचा निघून गेला. त्याचं उत्तुगं व्यक्तिमत्वने तेजस्वी वक्तृत्वाने सामान्य नागरिकाच्या मनावर राज्य केलं.विरोधकना देखील नम्र पणे आपलंस केले. अटलबिहारी जन्म 25डिसेंबरचा 1924 मध्यप्रदेश मधील ग्वालियर मधला महाविद्यालयाच्या जीवनापासूनच समाजकार्य काम सहभागी होते.1939साली अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सहभागी झाले आणि तेथूनच त्यांच्या राजकीय जीवनाचा प्रवास सुरू झाला.
खरंतरं इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले तेव्हा काँग्रेस विरोधी नेतृत्वाची कणखर धुरा वाजपेयी यांच्याकडे आली आणि ती त्यांनी अत्यंत समर्थपणे सांभाळत असतानाचं 1984 मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर पुन्हा कॉग्रेस सरकार सत्तेवर आले. पण केवळ भाजपचे 2खासदार असताना देखील त्यांनी समविचारी मध्यम मार्ग निवडत त्यांनी राममंदिर मुद्दा लावून धरत त्यानी परत आपल्या सत्ता खेचून आणली. हिदूं धर्म नेमका काय असावा त्याविषयी नेमके म्हणने त्यांनी सांगितले.राज धर्माचे पालन कसे करावे हे अटल जी नी देशासमोर घालून दिले. संसदेत भाषण करताना अत्यंत विनम्र पणे आपल्या वाणीतून नेमके बोलत असतं .अटलजी राजकारबरोबर ,कलाप्रेमी होते. त्याचे कलाबरोबर ऋणानुबंध होते. जसे कलाकाराबरोबर सबंध होते तसेच राजकारणपलीकडे मैत्री संबंध जपणारा लोकप्रिय नेता म्हणून ओळख होती. अटलजी तुम्ही शरीराने आमच्यातून गेला आहात पण मनाने मात्र काय सामन्या जनतेच्या मनात आहात आणि कायम राहाल . राजकारतील पितामहाला विनम्र आदंराजली.
हे देखील वाचा
न वसंत हो,न पतझड
हो सिर्फ उंचाई का अंधड
मात्र अकेलापन का सन्निटा|
सुशील कुलकर्णी ,पुणे