रावेर : तालुक्यातील विश्रामजीन्सी येथे प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रेम प्रकरणाला कुटुंबियांचा विरोध असल्याने युगूलाने हे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी धाव घेतली. मुकेश पवार (25) व गायत्री पवार (20) अशी मयतांची नावे आहेत.
शेतातील झाडाला घेतला गळफास
रावेर तालुक्यातील विश्रामजीन्सी गावाजवळील एका शेतातील झाडाला गळफास घेत तरुणासह तरुणीने आत्महत्या केली. ही बाब शनिवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. घटनास्थळी पोलिस निरीक्षक कैलास नागरे, पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे व सहकार्यांनी धाव घेतली.