पिंपरी : भोसरीच्या बालाजीनगर झोपडपट्टीत महिलेवर वार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याचे समजते. आरोपीला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सपना संजय गायकवाड (वय 22) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीचे नाव असून आरोपी दीपक गायकवाड याला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तरुणीच्या गालावर व मानेवर वार करण्यात आले असून तिच्यावर पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.