प्रेयसीची आत्महत्या; प्रियकरावर गुन्हा

0
पिंपरी-चिंचवड :  प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून प्रियकराने दुसर्‍याच तरुणीसोबत विवाह जमविला. याचा मानसिक धक्का सहन न झाल्याने प्रेयसीने आत्महत्या केली. या प्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईश्‍वरी बाबूराव पोकळे (वय 22, रा. नयन गोविंद गार्डन, पिंपळे गुरव) असे आत्महत्या केलेल्या प्रियसीचे नाव आहे. याप्रकरणी योगेश गोकूळ सोनावणे (रा. प्रिय अपार्टमेंट, सिडको, रामनगर, औरंगाबाद) याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुष्पा बाबूराव पोकळे (वय 50, रा. पैठण, औरंगाबाद) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
चार वर्षे राहिले एकत्र
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै 2018 ते 14 नोव्हेंबर 2018 या कालावधीत आरोपी सोनावणे याने ईश्‍वरी यांना लग्नाचे आमिष दाखविले. दरम्यान दोघेही एकाच रूमवर एकत्र राहत होते. मात्र योगेश याने दुसर्‍याच मुलीसोबत विवाह ठरविला. त्यामुळे ईश्‍वरी सैरभैर झाल्या. माझ्याशी लग्न कर असा तगादा त्यांनी योगेशकडे लावला होता. दरम्यान त्याने लग्नास नकार दिल्याने ईश्‍वरी यांना हा धक्का सहन न झाल्याने राहत्या घराच्या टेरेसवरून उडी मारून त्यांनी आत्महत्या केली. यावरून योगेश याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अलका सरग तपास करीत आहेत.