विल्लीपुरम : वाद झाल्याने प्रेयसीच्या वाढदिवसालाच प्रियकराने तीच्यावर गोळ्या झाडून तिची हत्या केली. आणि त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून त्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कार्तिक (२५) असे त्याचे नाव आहे. चेन्नईमध्ये तो पोलीस कॉन्सटेबल म्हणून कार्यरत होता. तर त्यांची प्रेयसी सरस्वती (२१) चेन्नईमधीलच वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होती.
कार्तिक आणि सरस्वतीची ओळख सोशल मीडियातून झाली होती. हळूहळू ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. मागील ४ वर्षांपासून ते दोघे एकमेकांसोबत असल्याचे म्हटले जात आहे.
या घटनेनंतर पोलीस अधिकारी जयकुमार यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून पुढील तपास चालू असल्याचे त्यांनी सांगितले.