प्रेरणादायी : बहीण भाऊंनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला १४ हजाराचा मदतनिधी

0

नंदुरबार। राज्यासह देशात सर्वत्र सुरू असलेल्या कोरोना विषाणू संदर्भात प्रशासनातर्फे  सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणून राज्य शासनाच्या दोन स्वतंत्र विभागात कार्यरत असलेल्या मराठे कुटुंबातील इंगळे बंधू-भगिनींनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आपल्या वेतनातील काही हिस्सा जिल्हाधिकारी यांच्याकडे धनादेशाद्वारे सुपूर्द केला.

नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील आरोग्य विभागात डायलिसिस टेकनिशियन म्हणून  कार्यरत माधुरी दत्तात्रेय इंगळे यांचा बुधवारी, आठ एप्रिल रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्या वेतनाच्या २५% रकमेचा धनादेश तिने दिला.

राज्य उत्पादन शुल्क विभागात दुय्यम निरीक्षक म्हणून कार्यरत शैलेंद्र दत्तात्रय मराठे यांनी देखील आपल्या वेतनाच्या २५%  रक्कमेचा धनादेश  जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्याकडे सुपूर्त केला. जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांनी इंगळे बंधू भगिनींचे कौतुक कौतुक केले. 

दोघे बहीण भाऊंनी मुख्यमंत्री सहायता निधी कोविडं १९ साठी १४ हजार २०० रुपये  मदतनिधी दिला आहे. यात दुय्यम पोलीस निरीक्षक शैलेंद्र मराठे यांचे १० हजार २०० रुपये असून माधुरी इंगळे यांचे ४ हजार रुपये असा संयुक्त निधी आहे. या सामाजिक कृतज्ञतेबद्दल इंगळे बंधू भगिनींचे सर्वत्र कौतुक होत आहे.