प्रेसचे कार्ड दाखवले अन् धुळ्यातील तोतया सीबीआय पोलिस जाळ्यात अडकले

शिरपूर तालुका पोलिसांची कामगिरी : पाड्यावर संतप्त जमाव जमताच दोघांचे पलायन

भुसावळ/धुळे : आम्ही सीबीआयचे विशेष पोलिस आहोत, तुम्ही बोगस बियाणे व खते विक्री करतात, असे सांगून शिरपूर तालुका पोलिस ठाणे हद्दील साखी पाडा (उमरदा) गावच्या किराणा दुकानदारास दमदाटी करण्यात आली, घराची झडतीदेखील घेण्यात आली मात्र घरात काहीच न सापडल्याने दुकानदारास ताब्यात घेण्यात आले व याचवेळी जमाव जमल्याने जमावातील एकाने तुम्ही कोण आहात? अशी विचारणा करताच संबंधिताने प्रेस लिहिलेले कार्ड दाखवल्याने संशयीतांचे बिंग फुटले. अत्यंत सिनेस्टाईल घडलेल्या या प्रकरणी शिरपूर तालुका पोलिसांनी चौकडीच्या मुसक्या आवळल्या तर अन्य दोघे मात्र पसार होण्यात यशस्वी झाले.

अन तोतया सीबीआय पोलिसांचे फुटले बिंग
शिरपूर तालुका पोलिस ठाणे हद्दील साखी पाडा (उमरदा) गाव असून येथे पावरा समाजाचे लोक बहुसंख्येने राहतात. सोमवार, 11 जुलै रात्री नऊ वाजेच्या सुमारास किराणा दुकानदार दादल्या गुजल्या पावरा यांच्याकडे स्कॉर्पिओ वाहनातील सात लोक आले व त्यांनी आम्ही सीबीआयचे विशेष पोलिस असल्याचे सांगून तुम्ही बनावट खते व बियाणे विक्री करतात म्हणून दम भरला व घर झडती सुरू केली मात्र काहीही न आढळल्याने दादल्या पावरा यांना ताब्यात घेवून गाडी बसवण्याची तयारी सुरू करण्यात आली. या प्रकारानंतर घाबरलेल्या दुकानदाराच्या पत्नीने घरातून 60 भार वजनाच्या चांदीच्या वेल्या दिल्या मात्र तरीदेखील पतीला संबंधित सोडत नसल्याने महिलेले आरडा-ओरड सुरू केल्याने गावातील जमाव जमला. जमावातील अर्जुन चिमा पावरा यांनी संबंधिताना तुम्ही कोण आहात? अशी विचारणा केली असता एकाने प्रेस व प्रहार लिहिलेले कार्ड दाखवल्याने संशय बळावला व जमावाचा रूद्रावतार पाहून ड्रायव्हरसह एकाने पळ काढला तर अन्य चौघे पसार होवू लागले.

नाकाबंदीत अडकले पाच आरोपी
तोतया पोलिसांची माहिती शिरपूर तालुका पोलिसांना कळवल्यानंतर नाकाबंदी लावण्यात आली. नाकाबंदीत पाच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आले. विजय रमेश देवरे (स्नेह नगर, धुळे), साहिल कबीर शेख (काझी प्लॉट, धुळे), राहुल दयाभाई पटेल (आंबेडकर नगर, देवपूर, धुळे), गोटीराम गीना पावरा (धाबादेवी पाडा, बोराडी), मिलिंद बन्सीलाल शेजवळ (सत्यसाईबाबा सोसायटी, धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींविरोधात शिरपूर तालुका पोलि ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पसार झालेल्या नितीन पुंडलिक मुकुंदे सह ड्रायव्हरचा पोलिस घेत आहेत.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ, भिकाजी पाटील, संदीप पाटील, जयराज शिंदे, काटकर, सईद शेख, प्रवीण धनगर, रणजीत वळवी, मनोज पाटील, मनोज नेरकर, प्रकाश भील आदींच्या पथकाने केली.