प्रौढ महिलेचा खून

0

बारामती: बारामती शहरातील भिगवण रस्त्यानजिक असलेल्या सदाशिव सहकारी गृहनिर्माण संस्थेतील एका प्रौढ महिलेचा खून झाल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली.

उषा संभाजी शिंदे (वय 52) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या अपार्टमेंटच्या एका सदनिकेतून दुर्गंधी येत असल्याची तक्रार सोसायटीतील नागरिकांनी केल्यानंतर पोलिसांनी दार फोडून प्रवेश केल्यानंतर ही घटना उघड झाली.  हा खून नेमका कशामुळे झाला आहे. याचा पोलिसांनी तपास सुरू केला असून लवकरच या खूनाचा तपास लागेल असे अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. संदिप पखाले व उपविभागीय पोलिस अधिकारी बापु बांगर यांनी सांगितले. त्यांनी घटनास्थळास भेट देउन तपासाबाबत सुचना दिल्या. तीक्ष्ण हत्याराने उषा शिंदे यांना मारून अज्ञात मारेकरी घराला बाहेरून कुलुप लावून निघुन गेला होता. उषा शिंदे या एकटयाच घरात रहात होत्या. त्या मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत होत्या एखाद्या ओळखीच्याच व्यक्तिने हा खून केल्याचा पोलिसांचा अंदाज असून पोलिसांनी शिंदे यांच्या मोबाईलच्या आधारे तपास वेगात सुरू केला आहे. अशी माहिती तपासी अधिकारी पोलिस निरिक्षक सुरेशसिंह गौड यांनी दिली आहे.