नवी मुंबई । पनवेल महापालिकेने सभेत प्लास्टिकबंदीचा निर्णय घेतला आहे. 50 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्याचे विघटन होत नसल्याने या पिशव्यावर कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही मोठ्या प्रमाणात या पिशव्याची विक्री तसेच वापर सुरू असून शहरात निर्माण होणार्या कचर्यात या पिशव्याचे प्रमाण लक्षणीय आहे. आज कचरा समस्येमध्ये मिनरल वॉटर ज्या बाटल्या प्लास्टिकच्या असतात याचाही मोठा हातभार आहे. प्लास्टिक बाटलीतून पाणी पिणे हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असल्याने प्लास्टिक बॉटल बनवणार्या कंपन्या व प्लांट यांच्यावरदेखील कारवाई करावी व प्लास्टिक बॉटलदेखील पनवेल शहरातून हद्दपार करावीत जेणेकरून कचरा समस्यादेखील वाढणार नाही.
कचर्यामुळे दुर्गंधी पसरते
पॉलिथिलीन आणि पॉलिप्रॉपिलीनने तार केलेल्या बाटल्या अनेक वापरांसाठी उपयुक्त आहेत. मात्र, यामध्ये थंड पाणी साठवून ठेवून आणि त्यांना नियमितपणे निर्जंतुक करत राहिलं तरच ते वापरणे सुरक्षित आहे. मिनरल वॉटरची बाटली तुम्ही विकत घेतल्यावर ती बाटली पुन्हा वापरु नये तसेच आपली नियमित पाण्याची बाटली कोमट पाणी, विनेगर किंवा अँटीबॅक्टेरिअल माऊथवॉशरने स्वच्छ करत राहावी. या प्रकारचे दुष्पपरिणाम प्लास्टिक बॉटल किंवा ग्लासमध्ये पाणी पिल्याने होत असून, प्लास्टिक बॉटल या ड्रेनेज गटारे आदीमध्ये अडकल्यास बहुतांश कचरा जमा होतो व परिसरात दुर्गंधी पसरते.
कंपन्या बंद करण्याची गरज
प्लास्टिक बॉटल व ग्लास यांच्या कारखाने व कंपन्या यांच्यावरदेखील कारवाई करून बंदी आणणे काळाची गरज आहे याची जाणीव ठेवून आपला आधार फाउंडेशन सामाजिक संस्थेतर्फे पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, महापौर कविता चौतमल, उपमहापौर चारुशीला घरत यांना दिले आहे. नुकताच पर्यावरणमंत्री यांनीदेखील प्लास्टिक बाटल्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यातील प्लास्टिक बाटल्या व ग्लास बनवणार्या कंपन्यांवर छोट्या मोठ्या व्यापार्याप्रमाणे धडक कारवाई होऊन कंपन्या बंद करण्याची गरज आहे.