प्लास्टिमुक्त जंजिरा किल्ला व प्लास्टिकमुक्त समुद्र किनार्‍यासाठी केली जनजागृती

0

भूगोल फाउंडेशनतर्फे राबविले गड-किल्ले संवर्धन अभियान

पिंपरी : पिंपरी-चिंचवड, पुणे येथील भूगोल फाउंडेशन संस्थेच्यावतीने अलीकडेच किल्ले मुरुड जंजिरा येथे दुर्गभ्रमण, स्वच्छता, प्रदूषण व पर्यावरण समतोल या विषयांशी संबंधित लोकसहभागातून भूसंवर्धनाकडे प्लॅस्टिमुक्त जंजिरा किल्ला व प्लास्टिकमुक्त समुद्र, समुद्रकिनारे, वृक्षसंवर्धन, स्थानिक लोकांमध्ये जनजागृती, प्रबोधन ही मोहीम राबविण्यात आली. सर्वप्रथम राजपुरा गावात पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी जनजागृती करण्यासाठी पत्रके वाटण्यात आली. स्थानिक लोकांचे प्रबोधन केले. त्यानंतर किल्ले परिसरात आलेल्या पर्यटकांना पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली. स्थानिक गावकर्‍यांना पर्यावरण व स्वच्छता याविषयी भूगोल फाउंडेशनचे ज्येष्ठ विठ्ठल वाळुंज यांनी प्रबोधन केले. यावेळी वनविभाग, पुरातत्त्व विभाग जंजिरा भारत सरकार, संतनगर मित्र मंडळ, इंद्रायणी सेवा संघ, नामदेव महाराज तरूण मंडळ शिवली-काटेवाडी मावळ या संस्था सहभागी झाल्या होत्या.

15 पोती कचरा गोळा

त्यानंतर गड परिसरामध्ये साफसफाई करण्यात आली. या मोहिमेत प्लॅस्टिक, बाटल्या व अविघटनशिल कचरा गोळा करण्यात आला. कड्याकपारीत, झाडाझुडपात जाऊन कचरा गोळा करण्यात आला. गडावर येणार्‍या पर्यटकांकडुन पाणी तसेच थंड पेयाच्या बाटल्या गड परिसरात टाकून दिल्या जातात. या सर्व वस्तू गोळा करण्यात आल्या. या मोहिमेत 15 पोती प्लास्टिक व थर्माकोल सदृश अविघटनशील कचरा गोळा करण्यात आला. तो पुरातत्त्व खात्याकडे सुपूर्द करण्यात आला. पर्यावरण रक्षण व्हावे, तिहासिक वास्तुचे जतन व्हावे या भावनेने ही मोहीम राबवण्यात आली. पुरातत्व खात्याचे घोगरे व त्यांचे सहकारी यांच्या मार्गदर्शनाने मोहीम राबवण्यात आली. अशी मोहीम प्रत्येक महिन्याला एका किल्ल्यावर राबवली जाते. भूगोल फाउंडेशनने शिवनेरी ते रायगडापर्यंत ही मोहीम राबवली आहे. आत्तापर्यंत शिवनेरी, लोहगड, पुरंदर, राजगड, तोरणा, तिकोणा, सिंहगड, तुंग, कोरीगड, चावंड, श्रीक्षेत्र भीमाशंकर व तीर्थक्षेत्र किल्ले रायगड व आता जलदुर्ग जंजिरा किल्ला स्वच्छता व पर्यावरण संरक्षण अभियान राबवण्यात आलेले आहे. यावेळी पुरातत्त्व विभागाचे घोगरे व त्यांचे सहकारी, रोहा वनविभागाचे दिनेश दिघे यांचे या कामात मोलाचे मार्गदर्शन झाले.

हे कार्यकर्ते झाले सहभागी

यावेळी भूगोल फाउंडेशनचे ज्येष्ठ मार्गदर्शक विठ्ठल (नाना)वाळूंज, निकुंज रेंगे, सुनील काटकर, अरविंद देवकर, बाळासाहेब गरुड, विठ्ठल लंघे, अविनाश खोसे, सुनील बांगर, दिलीप शिंदे, झारखंडे राय, उदित शिंदे, मनोज ठोले, चव्हाण सुहास, सुरेश शर्मा, दीपक जगताप, नवनाथ देवकर, प्रकाश चौधरी, सचिन दोरजे, रामनिवास, बलजितकुमार, सत्याकुमार, सोबितकुमार व त्यांचे सहकारी तसेच संतनगर मित्र मंडळ व इंद्रायणी सेवा संघाचे साहेबराव गावडे, अनिल घाडगे, चंद्रकांत थोरात, बंडु येरावार, नितीन गावडे, सुरेश येरावार ,विशाल शेवाळे व नामदेव महाराज तरूण मंडळ शिवली मावळ येथील गणपत आडकर, बाबाजी सुतार, बबन सुतार, अमोल फुले, देवा लगड, आदेश गरूड व त्यांचे इतर सहकारी सहभागी झाले होते.