जळगाव । जळगावकरांनी प्लास्टिकचे तोटे लक्षात घेवून पर्यावरणाला कसा धोका पोहचतो हे समजून घ्यावे. पूर्वी आई कापडी पिशवीत भाकरी बांधून देत होती, आज तो काळ गेला. प्लास्टीकचे दुष्परिणाम लक्षात घेवून जळगावकरांनी प्लास्टीकमुक्त जळगाव निर्माण करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले. एकता रिटेल किराणा मर्चंटस् पतसंस्था आणि जळगाव मनपातर्फे राबविण्यात येणार असलेल्या वापरू या कापडी पिशवी आजपासून या उपक्रमाचे गुरूवारी सकाळी उद्घाटन करण्यात आले. महात्मा गांधी मार्केटच्या चौकात पार पडलेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
मान्रवरांनी व्रक्त केले मनोगत : महिलांनी घरातून बाहेर पडणार्या प्रत्येकाला एक कापडी पिशवी द्यायला हवी. चहा विक्रेत्यांनी प्लास्टिकच्या कपांचा वापर टाळून पर्यावरण संर्वधनाला हातभार लावायला हवा, असे त्यांनी सांगितले. महापौर ललीत कोल्हे यांनी, मनपाने प्लास्टिकमुक्त जळगावसाठी हाती घेतलेल्या उपक्रमात एकता पतसंस्थेने घेतलेला पुढाकार वाखणण्याजोगा असल्याचे सांगितले. तसेच प्रत्येकाने प्लास्टिकमुक्त जळगावची जाणीव ठेवावी, असे आवाहन केले. माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी, पर्यावरणाचा होत असलेला र्हास जागतिक समस्या बनली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने काहीतरी करायला हवे, असे उपस्थित मान्रवरांनी व्रक्त केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी व्यासपिठावर मनपा आरोग्य अधिकारी उदय पाटील, पतसंस्थेचे उपाध्यक्ष घनःश्याम आडवाणी उपस्थित होते. सूत्रसंचलन प्रणिता कोलते यांनी केले. यशस्वीतेसाठी दिलीप झाबक, सचिन चोरडीया, सुभाष तोतला, चंद्रप्रकाश सांखला, सुदर्शन बरडिया, सुभाष कासट, सुभाष कांकरिया, रमेश कांकरीया, तुलसीदास आहुजा, अशोक आहुजा, धनराज चावला, वसीम काझी, अमर कुकरेजा, अमीत भावनानी, योगेश बारी, सप्नील सिनकर, अरविंद संत यांनी परिश्रम घेतले.