भुसावळ- खडकारोड भागातील प्लॉट खरेदीत महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरूद्ध भुसावळ शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दुर्गा शांताराम सनांसे (रा. शिक्षक कॉलनी, रावेर) यांची जमीन व्यवहारात फसवणूक झाल्याने त्यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून फारूक शेख, हबीब शेख, अनिल कोळी आणि एका अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक के.टी. सुरळकर, हवालदार मोहंमद सय्यद अली करीत आहेत.